काश्मीरमध्ये ३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार
By Admin | Updated: February 25, 2015 16:33 IST2015-02-25T16:33:25+5:302015-02-25T16:33:25+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

काश्मीरमध्ये ३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार
ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. २५ - जम्मू-काश्मीरमध्ये एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार पीडित मुलीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले.
जम्मूतील चिनोरे भागात ही घटना घडली असून मुलीचे आई वडिल हे स्थलांतरीत रोजंदारीवरील कामगार आहेत. मंगळवारी मुलीचे आई वडिल कामानिमित्त घराबाहेर तसेच अन्य दोन मुले शाळेत गेली होती. पीडित मुलगी घरी एकटीच होती. याचाच गैरफायदा घेत अज्ञात इसमाने ३ वर्षाच्या मुलीवर जबरी बलात्कार केला. मुलीचे आई वडिल कामावरून घरी आल्यानंतर त्यांना मुलगी बेशुध्दावस्थेत घरी पडल्याचे दिसले. तात्काळ मुलीच्या पालकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले असता मुलीवर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञांताविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.