काश्मीरमध्ये ३ दहशतवादी ठार
By Admin | Updated: July 5, 2017 01:09 IST2017-07-05T01:09:59+5:302017-07-05T01:09:59+5:30
काश्मीरच्या पुलवामा भागात सुरक्षा दलाने मंगळवारी आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला असून, गेल्या २४ तासांत चकमकींमध्ये

काश्मीरमध्ये ३ दहशतवादी ठार
सुरेश डुग्गर/लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीनगर : काश्मीरच्या पुलवामा भागात सुरक्षा दलाने मंगळवारी आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला असून, गेल्या २४ तासांत चकमकींमध्ये ठार झालेल्या अतिरेक्यांची संख्या त्यामुळे तीन झाली आहे. आज चकमकीच्या वेळी जवानांनी बामनू परिसरात दहशतवादी लपलेल्या इमारतीलाच उडवल्याचे सांगण्यात आले.
या चकमकीवेळी स्थानिकांनी जवानांवर दगडफेक केली. या वेळी दगडफेक करणारे १0 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. सध्या काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलातर्फे दहशतवाद्यांविरोधात विशेष कारवाई सुरू करण्यात आली आहे. काल चकमकींमध्ये दोन दहशतवादी मारले गेले होते. ते दोघेही स्थानिक होते आणि आज ठार झालेला दहशतवादी हा मात्र स्थानिक नाही, असे समजते.