सुसाईड नोट लिहून तामिळनाडूत ३ विद्यार्थींनींनी संपवले जीवन

By Admin | Updated: January 24, 2016 11:36 IST2016-01-24T10:08:03+5:302016-01-24T11:36:25+5:30

विलुप्पुराम येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ३ विद्यार्थिनीं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे झाली. महाविद्यालयातील परीसरात असलेल्या विहीरीत उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

3 students left Tamilnadu by writing a suicide note | सुसाईड नोट लिहून तामिळनाडूत ३ विद्यार्थींनींनी संपवले जीवन

सुसाईड नोट लिहून तामिळनाडूत ३ विद्यार्थींनींनी संपवले जीवन

 ऑनलाइन लोकमत

तामिळनाडू, दि. २४ - विलुप्पुराम येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ३ विद्यार्थिनीं आत्महत्याकेल्याची धक्कादायक घटना आज पहाटे झाली. महाविद्यालयातील परीसरात असलेल्या विहीरीत उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी महाविद्यालयाचे चेअरमन यांच्यासह अन्य काही जणांना अटक केली आहे.

शहरातील एसव्हीएस मेडिकल महाविद्यालयात त्या शिक्षण घेत होत्या. महाविद्यालयातील अपुऱ्या सोयी सुविधांच्या अभावामुळे या मुलींनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. तर गेल्या १ महिन्यांपासून या विद्यार्थीनींचे महाविद्यालय प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू होते.

वैद्यकीय आणि चिकित्सा संशोधन महाविद्यालयात शिकणाऱ्या या तीनही मुली द्वितीय वर्षात शिक्षण घेत होत्या. या तिघींनीही महाविद्यालय परिसरातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तर आत्महत्येपूर्वी लिहलेल्या पत्रात त्यांनी महाविद्यालय प्रशासनच मृत्यूला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. गेल्या १ महिन्यांपासून या मुलींकडून अपुऱ्या सोयीसुविधांबद्दल महाविद्यालयाचा निषेध नोंदवण्यात येत होता. मात्र, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची तीव्रता गेल्या आठवड्यात वाढली होती. 

 

 

Web Title: 3 students left Tamilnadu by writing a suicide note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.