शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

दर तासाला ३ खून अन् दिवसाला ७८ हत्या; देशातील गुन्ह्यांची धक्कादायक आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 06:53 IST

महिलांवर प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांची १८.७ टक्के प्रकरणे दाखल झाली असून, ७.१ टक्के प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी  दिल्ली : २०२२ मध्ये देशभरात २८ हजार ५२२ खुनांच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून, प्रत्येक दिवशी ७८ हत्या झाल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या क्राइम इन इंडिया या अहवालातून समोर आले आहे. 

देशभरात महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांच्यावरील गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे ४ टक्के, ८.७ टक्के, ९.३ टक्के, १३.१ टक्के आणि १४.३ टक्के वाढ झाली आहे, तर आर्थिक गुन्ह्यांमध्ये ११.१ टक्के वाढ झाली आहे. अहवालानुसार, देशभरात भ्रष्टाचार १०.५ टक्क्यांनी वाढला असून, सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल २४.४ टक्के वाढ झाली आहे.

महिलांवरील अत्याचारात किती वाढ? २०२२ मध्ये महिलांवरील अत्याचारात २०२१ च्या तुलनेत ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२२ मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या ४ लाख ४५ हजार २५६ गुन्ह्यांची नोंद झाली असून, २०२१ मध्ये हे प्रमाण ४,२८,२७८ इतके होते. पती किंवा त्यांच्या नातेवाइकांकडून छळ होत असल्याची प्रकरणे सर्वाधिक ३१.४ टक्के असून, अपहरणाची प्रकरणे १९.२ टक्के आहेत. महिलांवर प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांची १८.७ टक्के प्रकरणे दाखल झाली असून, ७.१ टक्के प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलांचा किती छळ? २०२२ मध्ये १,६२,४४९ मुलांच्या छळाच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. २०२१ मध्ये हेच प्रमाण १,४९,४०४ इतके होते. २०२२ मध्ये यात ८.७ टक्के इतके झाले आहे. यातील बहुतांश गुन्हे अपहरणाशी (४५.७ टक्के) संबंधित आहेत.वृद्धांनीही सावध राहण्याची गरज२०२१ मध्ये ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले करणे, त्यांची फसवणूक करण्याचे २६,११० गुन्हे दाखल झाले होते. यात तब्बल ९.३%ने वाढ होत हे प्रमाण ३८,५४५ इतके झाले आहे. यापैकी बहुतांश गुन्हे चोरी, फसवणूक करणे या संदर्भातील आहेत.

अनुसूचित जाती, जमातींवरील हल्ले वाढेअनुसूचित जातींमधील नागरिकांवर केलेल्या हल्ल्यात २०२२ मध्ये १३.१ %ने वाढ झाली आहे. २०२१ मध्ये असे गुन्हे ५०,९०० होते, त्यात वाढ होत यातील गुन्ह्यांचे प्रमाण ५७,५८२ इतके झाले आहे. अनुसूचित जमातीमधील नागरिकांवरील हल्ल्यांत १३.३%ने वाढ झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी