शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

देशातील सर्वात उंचावरील रोप-वेमध्ये रात्रभर जीव मुठीत धरून हवेत लटकत होते ४८ भाविक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 05:59 IST

झारखंडच्या देवघर परिसरात त्रिकूट पर्वतावर झालेल्या रोपवे दुर्घटनेमुळे अवघा देश हादरून गेला आहे.

देवघर (झारखंड) :झारखंडच्या देवघर परिसरात त्रिकूट पर्वतावर झालेल्या रोपवे दुर्घटनेमुळे अवघा देश हादरून गेला आहे. घटनास्थळ बाबा बैद्यनाथ मंदिरापासून साधारण २० किलोमीटरवर आहे. रोपवेमध्ये बिघाड झाल्यानंतर एनडीआरएफच्या पथकांनी युद्धपातळीवर हालचाली करून सोमवारी दिवसभर ३३ जणांना सुखरुप खाली उतरवले आहे. एकूण तीन जणांच्या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. ४८ जण अन्न पाण्यावाचून रात्रभर जीव मुठीत धरून हवेत लटकत असलेल्या ट्रॉलीत हेलकावे खात होते. २३ तास उलटल्यानंतरही ट्रॉलीमध्ये अद्यापही १४ जण अडकले आहेत. अंधार पडू लागल्याने बचावकार्य आता मंगळवारी सकाळी सुरु करण्यात येणार आहे. अडकलेल्यांना ड्रोनच्या सहाय्याने पाणी आणि खाद्यपदार्थ दिले जात आहेत. देवघरचे उपायुक्त मंजुनाथ भजंत्री म्हणाले की, ‘भाविकांना हवाई दलाच्या २ हेलिकॉप्टर्सच्या मदतीने खाली उतरवले आहे. तांत्रिक बिघाडामुळे रोपवेची एकमेकांना धडक झाली.’ 

१९ तास ट्रॉलीत अडकून पडलेल्या संदीप यांनी सांगितले की, ‘मला असे वाटते की बाबा बैद्यनाथ यांनी मला पुनर्जन्म दिला. मी रात्रभर हवेत लटकत असलेल्या ट्रॉलीत अडकून पडल्याचा भयानक अनुभव मी शब्दांत सांगू शकत नाही. जवळपास १०० फूट उंचीवर ट्रॉली हवेत लटकलेली होती.’

काय घडले?दुपारी ४ वाजता (रविवारी) हा बिघाड झाला२६ ट्रॉली मंदिराकडे निघाल्या होत्या तारांवर वजन वाढल्याने रोलर तुटला व तीन ट्रॉली डोंगराला धडकल्या त्यावेळी दोन ट्रॉली खाली कोसळल्या१२ प्रवासी जखमी झाले, दोघांचा मृत्यू झालात्यानंतर अन्य ट्रॉली आपसात धडकल्या आणि थांबल्या३३ जणांना  एनडीआरफच्या पथकांनी सुखरूप खाली उतरवले सोमवारी सहा वाजल्यानंतर अंधार पडू लागल्याने बचावकार्य थांबवले आहे

 ...पण त्याला मृत्यूने गाठलेचएनडीआरएफने मदतकार्य सुरू केल्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे काही भाविकांना बाहेर काढण्यात येत होते. याच दरम्यान एका भाविकाला केबलकारमधून बाहेर काढत हेलिकॉप्टरपर्यंत नेले. हा भाविक हेलिकॉप्टरच्या दरवाजापर्यंत पोहोचला पण आत शिरत असताना त्याचा बेल्ट तुटला आणि काही क्षणात तो खाली पडला.मला असे वाटते की बाबा बैद्यनाथ यांनी मला पुनर्जन्म दिला. मी रात्रभर हवेत लटकत असलेल्या ट्रॉलीत अडकून पडल्याचा भयानक अनुभव मी शब्दांत सांगू शकत नाही. जवळपास १०० फूट उंचीवर ट्रॉली हवेत लटकलेली होती.’ऑ- संदीप १९ तास ट्रॉलीत अडकून पडला हाेता. 

 

टॅग्स :JharkhandझारखंडAccidentअपघात