शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Handwara Militant Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, CRPF चे तीन जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 19:51 IST

Handwara Militant Attack: हंदवाडामधील वानीगाम परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी घेराव घातला असून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

ठळक मुद्देहंदवाडा भागात सीआरपीएफच्या 92 बटालियनचे एक पथक गस्त घालत होते.दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील हंदवाडामध्ये आज संध्याकाळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर अचानक गोळीबार केला. या गोळीबारात तीन जवान शहीद झाले आहेत. तसेच, जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा खात्मा झाल्याचे समजते. दरम्यान, हंदवाडामधील वानीगाम परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी घेराव घातला असून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंदवाडा भागात सीआरपीएफच्या 92 बटालियनचे एक पथक गस्त घालत होते. त्यावेळी या भागातील वानीगाममध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. अचानक केलेल्या या गोळीबारात तीन जवान शहीद झाले. तर सात जवान जखमी झाले आहेत. याशिवाय, दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे.

जवानांवर हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. या हल्ल्याची माहिती मिळताच लष्कर, एसओजी आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून वानीगाम परिसरात घेराव घातला आहे. तसेच, दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे असून या भागात सर्व मार्ग सील करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथील राजवार परिसरात लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत दहशतवाद्यांशी दोन हात करताना लष्कराच्या पाच जणांसह जम्मू काश्मीर पोलीस दलातील एक जण शहीद झाला आहे. दहशतावाद्यांचा सामना करताना हौतात्म्य पत्करलेल्या पाच जणांमध्ये लष्करातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. तसेच, या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर हैदर यालाही जवानांनी कंठस्नान घातले. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी