शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

देशात ३ कोटी चाचण्या, कोरोना टेस्टचा नवा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 06:51 IST

दररोज दहा लाख कोरोना चाचण्या करण्याचे लक्ष्य भारत लवकरच गाठण्याची शक्यता आहे.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : देशभरात आतापर्यंत पार पडलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या रविवारी तीन कोटी झाली असून हा एक विक्रम आहे. शनिवारी ही संख्या २ कोटी ९३ लाख होती. रविवारी त्यामध्ये सात लाखांहून अधिक चाचण्यांची भर पडली. दररोज दहा लाख कोरोना चाचण्या करण्याचे लक्ष्य भारत लवकरच गाठण्याची शक्यता आहे.दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या संख्येत वेगाने वाढ करण्यात आल्याने अवघ्या पंधरा दिवसांत चाचण्यांचा एकूण संख्येचा आकडा २ कोटींवरून ३ कोटींवर गेला. त्याआधी हा आकडा १ कोटींवरून २ कोटींवर जाण्यास एक महिना लागला होता. शनिवारी देशात ८ लाख ६९ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता दरदिवशी १० लाख कोरोना चाचण्या करण्याचा टप्पा लवकरच गाठण्याची शक्यता आहे. दररोज १० लाख कोरोना चाचण्या पार पाडाव्यात, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेला १ आॅगस्ट रोजी दिले होते. मार्च महिन्यात देशभरात फक्त ३०० कोरोना चाचण्या होत होत्या आणि आता देश दररोज १० लाखांचा टप्पा गाठण्याकडे वाटचाल करीत आहे. कोरोना चाचण्यांसाठी देशामध्ये अगदी प्रारंभी तीनच प्रयोगशाळा होत्या. आता त्यांची संख्या पाच महिन्यांत दीड हजारांपर्यंत गेली आहे. त्यात महाराष्ट्रातील १४४ प्रयोगशाळांचा समावेश आहे. या राज्यात खासगी क्षेत्रातील ६७ प्रयोगशाळा कोरोना चाचणीच्या कामात सहभागी झाल्या आहेत.कोरोनाच्या अधिकाधिक चाचण्या केल्याने रुग्णांसंदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होते. त्यामुळे राज्यांनी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचे प्रमाण १५ आॅगस्ट रोजी ९.५ टक्क्यांवरून ८.८ टक्क्यांपर्यंत खाली घसरले, ही दिलासादायक बाब आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस