शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेसंदर्भात न्यायालयात २९७ प्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 01:07 IST

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांशी संबंधित स्थानिक तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयात सुमारे २९७ प्रकरणे सुरू असतानाच नियमितपणे प्रकरणांमध्ये भर पडतच असल्याने जिल्हा परिषदेच्या वकील पॅनलवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांशी संबंधित स्थानिक तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयात सुमारे २९७ प्रकरणे सुरू असतानाच नियमितपणे प्रकरणांमध्ये भर पडतच असल्याने जिल्हा परिषदेच्या वकील पॅनलवर मोठा ताण निर्माण झाला आहे. न्यायालयीन प्रकरणांसदर्भात न्यायालायाचा अवमान होऊ नये तसेच जिल्हा परिषदेची भूमिका वेळीच स्पष्ट होणे अपेक्षित असल्याने जिल्हा परिषदेने विधी अधिकारी नियुक्त करून विधी कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.  जिल्हा परिषदेच्या संदर्भात अनेकांचे अनेक प्रकारचे आक्षेप असतात. त्यामुळे जिल्हा, दिवाणी, फौजदारी, कामगार, औद्योगिक न्यायालयांमध्ये अनेक प्रकरणे दाखल झालेली आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने न्यायालयाचे कामकाज पाहण्यासाठी नऊ विधी तज्ज्ञ तसेच सर्वोच्च, उच्च न्यायालय, दिल्ली, मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथील न्यायालयीन प्रकरणांमध्ये कामकाज पाहणाऱ्या जिल्हा परिषद वकील पॅनलवर १४ विधितज्ज्ञ आहेत. या वकील पॅनल्सला न्यायलयीन लढाई लढण्याबरोबरच न्यायालयीन निकालाची अंमलजबावणी करणे अथवा अपिलात जाणे, खंडपीठात जाणे आदी कामेदेखील करावी लागतात. यातून कार्यवाहीस विलंब होऊन परिणामी अवमान याचिका दाखल होण्याचीदेखील शक्यता असते.  जिल्हा परिषदेसंदर्भात स्थानिक स्तरावर सद्यस्थितीत १७१ तर सर्वोच्च व उच्च न्यायालयीन स्तरावर १२६ अशी एकूण २९७ न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत. सदर प्रकरणे ही जिल्हा परिषदेचे वकील पॅनल हाताळत आहेत.  ही बाब लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात विधी कक्ष स्थापन करून विधी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकरणांचा वेळीच निपटारा करण्याबरोबरच अवमान याचिका दाखल होऊ नये असा गिते यांचा प्रयत्न असून, सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने जिल्हा परिषदेत लवकरच विधी कक्ष स्थापन होणार आहे.अवमान याचिका दाखल होण्याची भीतीसद्यस्थितीतील प्रकरणांची संख्या लक्षात घेता नव्याने दाखल प्रकरणांची संख्या पाहता वकिलांचे कामकाज मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुद्देनिहाय अभिप्राय, तसेच प्रतिज्ञापत्र दाखल करणे, न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करणे, न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने विहित मुदतीत अंमलबजावणी करणे, अथवा त्याविरुद्ध अपील दाखल करणे आदी कामे वकील पॅनल्सला करावी लागतात. नव्याने प्राप्त होणारी प्रकरणे तसेच न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणी न्यायनिर्णयाचा स्पष्ट व योग्य तो अर्थबोध होण्यासाठी त्यावर विधितज्ज्ञांचे अभिप्राय प्राप्त करून कार्यवाही करणे अपेक्षित असते. यासाठी मुंबई, औरंगाबाद येथे संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना प्रत्यक्ष जाणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे कार्यवाहीस विलंबदेखील होऊ शकतो. यामुळे अवमान याचिका दाखल होण्याची भीती असते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद