२९... सारांश... जोड
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:35+5:302015-01-29T23:17:35+5:30
जलालखेडा - चांदणीबर्डी मार्गाची दुरुस्ती करा

२९... सारांश... जोड
ज ालखेडा - चांदणीबर्डी मार्गाची दुरुस्ती करामेंढला : नरखेड तालुक्यातील चांदणीबर्डी हे तीर्थस्थळ असल्याने तिथे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. जलालखेडा - चांदणीबर्डी या मार्गावर खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता बळावली असून, भाविकांना तसेच इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. ***वन्यप्राण्यांनी केली पिके उद्ध्वस्त नांद : भिवापूर तालुक्यातील नांद परिसरातील जंगलव्याप्त शिवारात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वन्यप्राणी रबी पिके खात असून, नासाडी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. वन विभागाने या शेतांचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ***तलावातील गाळ काढण्याची मागणीखापा : सावनेर तालुक्यातील बहुतांश तलावातील गाळ कित्येक वर्षांपासून काढण्यात आला नाही. त्यामुळे या तलावातील पाणी साठवण क्षमता कमी होत असून तलाव बुजल्यागत झाले आहे. या तलावातील गाळ काढून तो शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. ***