२९... पारशिवनी... एसीबी

By Admin | Updated: January 30, 2015 00:54 IST2015-01-30T00:54:10+5:302015-01-30T00:54:10+5:30

(फोटो)

29 ... Parasivani ... ACB | २९... पारशिवनी... एसीबी

२९... पारशिवनी... एसीबी

(फ
ोटो)
लाचखोर पोलीस हेडकॉन्स्टेबलला अटक
पारशिवनीतील प्रकार : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई
पारशिवनी : गैरसमजुतीतून उद्भवलेला वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. यात गुन्हा न नोंदविण्यासाठी फिर्यादीला तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या हेडकॉन्स्टेबलला लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई पारशिवनी शहरातील सावनेर - रामटेक मार्गावरील भारतीय स्टेट बँकेच्या जवळ असलेल्या झेरॉक्स दुकानासमोर गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
यशवंत महादेव तामगाडगे (५६, रा. बुटीबोरी) असे लाचखोर हेडकॉन्स्टेबलचे नाव आहे. फिर्यादी भीमराव दशरथ लांजेवार (३९, रा. सालई मोकासा, ता. पारशिवनी) यांचा स्थानिक तरुणांशी गैरसमजुतीतून वाद उद्भवला होता. ही घटना ८ डिसेंबर २०१४ रोजी घडली होती. सदर प्रकरण पारशिवनी पोलीस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी तसेच गुन्ह्याची नोंद न करण्यासाठी तामगाडगे याने भीमराव लांजेवार यांना तीन हजार रुपयांची मागणी केली होती. लांजेवार यांनी तामगाडगे याला काही दिवसांपूर्वी या रकमेतील ४०० रुपये दिले होते.
तामगाडगे हा लांजेवार यांना उर्वरित रक्कम २ हजार ६०० रुपयांची वारंवार मागणी करीत होता. दरम्यान, भीमराव लांजेवार यांनी या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी पारशिवनी येथे सापळा रचला. तामगाडगे हा लांजेवार यांना भारतीय स्टेट बँकेच्या शाखेजवळ भेटला. आपल्याजवळ पूर्ण रक्कम नसल्याने एटीएममधून काढून देण्याची लांजेवार यांनी बतावणी केली. शिवाय, जवळ असलेली रक्कम तामगाडगे याला दिली. ती रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला लगेच ताब्यात घेतले.
या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंदविण्याची कारवाई सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद वाकडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)
***

Web Title: 29 ... Parasivani ... ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.