२९... नरखेड... आरक्षण
By Admin | Updated: January 29, 2015 23:16 IST2015-01-29T23:16:59+5:302015-01-29T23:16:59+5:30
१७ ग्रामपंचायतींमधील १४७ जागांचे आरक्षण जाहीर

२९... नरखेड... आरक्षण
१ ग्रामपंचायतींमधील १४७ जागांचे आरक्षण जाहीरनरखेड तालुका : ५० टक्के जागा महिलांच्या वाट्यालानरखेड : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या १४७ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या जागांचे आरक्षण जाहीर केले. यातील ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्याने पुरुष उमेदवारांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.स्थानिक तहसील कार्यालयात बुधवारी या ग्रामपंचायत निवडणुकीची आरक्षण सोडत घेण्यात आली. या १७ ग्रामपंचायतींमध्ये जलालखेडा, पेठ इस्माईलपूर, मदना, थुगाव (देव), दातेवाडी, उमठा, अंबाडा (सायवाडा), सायवाडा, सिंजर, खेडी खरबडी, थडीपवनी, महेंद्री, देवळी, खैरगाव, माणिकवाडा, येरला (इंदोरा), जामगाव (खुर्द) या गावांचा समावेश आहे. या गावांमधील ५५ प्रभागांमधील १४७ जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यातील ५० टक्के जागा महिलांच्या वाट्याला गेल्या आहेत. त्यामुळे यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये पुरुष सदस्यांपेक्षा महिला सदस्यांची संख्या अधिक असणार आहे. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार एच. टी. झिरवाळ, नायब तहसीलदार खणगण, जयवंत पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)***