२९... गुन्हे... जोड... ०१
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:35+5:302015-01-29T23:17:35+5:30
विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

२९... गुन्हे... जोड... ०१
व जेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू नागपूर : विजेचा जोरदार धक्का लागल्याने तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या करंजोली शिवारात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.महेश महादेव नानवटकर (३२, रा. करंजोली, ता. नरखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. महेश हा त्याच्या करंजोली शिवारातील शेतात ओलित करत होता. त्यातच त्याच्या अंगावर जिवंत विजेची तार अडकविलेला बांबू पडल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का लागला. त्यातच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. या प्रकरणी जलालखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.***दुचाकी चोरट्यांना अटकपारशिवनी : मोटरसायकल चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना पारशिवनी पोलिसांनी नुकतीच अटक केली. यातील अन्य एक आरोपी पसार असून, त्याचा शोध सुरू असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.राजेंद्र सिंग (२१) व संजय बाबुलाल चव्हाण (२३) दोघेही खदान क्रमांक - ६, कन्हान, ता. पारशिवनी अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची तर, चिंटू ऊर्फ अखिलेश सिंग असे पसार असलेल्या चोरट्याचे नाव आहे. फिर्यादी गजानन तेजराम बिच्छोरे रा. पटगोवारी यांनी त्यांच्या मालकीची एमएच-४०/एएफ-०६८२ क्रमांकाची मोटरसायकल पारशिवनी तालुक्यातील माहुली नजीकच्या डोलामाईन परिसरात उभी ठेवली होती. दरम्यान, या तिघांनी संगनमत करून ही मोटरसायकल मंगळवारी दुपारी चोरून नेली होती. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. दरम्यान, या प्रकरणातील दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी चोरट्यांकडून त्यांनी चखेरून नेलेल्या मोटरसायकलसह त्यांनी चोरी करण्यासाठी वापरलेली एमएच-४०/एएच-२३८७ क्रमांकाची मोटरसायकल जप्त केली. त्यांच्याकडून चोरीच्या आणखी काही घटना उघड होण्याची शक्यता पारशिवनी पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर घटनेचा तपास नत्थू मेहर व राकेश नलगुंडवार करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)***