२९... गुन्हे... अपघात

By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:36+5:302015-01-29T23:17:36+5:30

अपघातात दुचाकीचालक ठार

29 ... crime ... accidents | २९... गुन्हे... अपघात

२९... गुन्हे... अपघात

घातात दुचाकीचालक ठार
कळमेश्वर : भरधाव मोटरसायकलने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फेटरी शिवारात बुधवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.
अतुल शंकर नगराळे (३०, रा. चांपा, ता. सावनेर) असे मृत दुचाकीचालकाचे नाव आहे. अतुल हा एमएच-४०/एसआर-७०६५ क्रमांकाच्या मोटरसायकलने बोरगावहून फेटरीकडे भरधाव येत होता. दरम्यान, रोडच्या कडेला उभ्या असलेल्या एमएचव्ही-५३५८ क्रमांकाच्या नादुरुस्त ट्रकवर त्याची मोटरसायकल आदळली. यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सदर घटनेचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश घुगे करीत आहे. (प्रतिनिधी)
***
ट्रकच्या धडकेत कामगाराचा मृत्यू
टाकळघाट : भरधाव ट्रकने सायकलला उडविले. यात गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळघाट शिवारात गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
सदर कामगाराची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. तो बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील इंडोरामा कंपनीत काम करायचा. तो गुरुवारी सायंकाळी सायकलने जात असताना कोळसा वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या सायकलला उडविले. यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच ट्रकचालक ट्रकसह पळून गेला. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (वार्ताहर)
***

Web Title: 29 ... crime ... accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.