२९... गुन्हे

By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:23+5:302015-01-29T23:17:23+5:30

कान्हादेवी येथून दुचाकी पळविली

29 ... crime | २९... गुन्हे

२९... गुन्हे

न्हादेवी येथून दुचाकी पळविली
नागपूर : पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कान्हादेवी येथून चोरट्यांनी मोटरसायकल चोरून नेल्याची घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
फिर्यादी भूषण कृष्णराव भालेराव (२५, रा. रेमंड कॉलनी, सावनेर) यांनी त्यांच्या मालकीची एमएच-४०/व्ही-५८३८ क्रमांकाची मोटरसायकल सोमवारी दुपारी कान्हादेवी येथे उभी ठेवली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. सदर मोटरसायकलची किंमत २५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***
डोरली शिवारातून केबल लंपास
नागपूर : कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोरली (भिंगारे) शिवारातून चोरट्यांनी केबबल लंपास केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.
डोरली (भिंगारे) शिवारात महावितरण कंपनीच्यावतीने केबल टाकण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, चोरट्यांनी या शिवारातूून २२० मीटर केबल कापून चोरून नेली. या केबलची किंमत सहा हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***
ट्रॉलीतून कोसळल्याने मजुराचा मृत्यू
नागपूर : भरधाव ट्रॅक्टरची ट्रॉली उसळल्याने त्यात बसलेला मजूर खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नापतरोली फाटा परिसरात मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.
गिरधर उद्धव बावनकर (३२, रा. बारापूर-तरोधी) असे मृत मजुराचे नाव आहे. गिरधर हा एमएच-४०/एल-६७६६ क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसून जात होता. दरम्यान, नापतारोली फाटा परिसरात भरधाव ट्रॅक्टरची ट्रॉली उसळली आणि गिरधर खाली कोसळला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याला लगेच भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी ट्रॅक्टरचालक सुधीर नान्हे (२७, रा. भिवापूर) याच्याविरुद्ध भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून त्याचा शोध घेणे सुरू केले आहे.
**

Web Title: 29 ... crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.