२९... एसीबी

By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:35+5:302015-01-29T23:17:35+5:30

चतुर्थ श्रेणी कर्मचारी अटकेत

29 ... ACB | २९... एसीबी

२९... एसीबी

ुर्थ श्रेणी कर्मचारी अटकेत
नागपूर : जन्माचा दाखला मिळवून देण्यासाठी लाच मागणऱ्या नागपूर महानगर पालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी दुपारी मनपाच्या गांधीबाग झोन कार्यालयात करण्यात आली.
केशव उईके, असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. फिर्यादी देवीदास घाटे यांच्या भाच्याचा जन्म नागपुरातील मेयो रुग्णालयात झाला. त्यामुळे त्यांना भाच्याचा जन्माचा दाखला हवा होता. यासाठी ते मनपाच्या गांधीबाग झोन कार्यालयात गेले. तिथे चतुर्थ श्रेणी कर्मचारी केशव उईके याने त्यांना सदर दाखल्यासाठी ६०० रुपयांची मागणी केली. दरम्यान, घाटे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. सदर तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. केशवने घाटे यांना नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालयासमोर बोलावले. तिथे लाच स्वीकारत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.
***

Web Title: 29 ... ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.