२८... उमरेड... सिंगल

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:36+5:302014-12-28T23:40:36+5:30

ठाणा येथे धार्मिक कार्यक्रम

28 ... Umred ... Single | २८... उमरेड... सिंगल

२८... उमरेड... सिंगल

णा येथे धार्मिक कार्यक्रम
उमरेड : तालुक्यातील ठाणा येथील होली फॅमिली चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी १५० वर्षे पुरातन चर्चवर आकर्षक रोशनाई करून सजावट करण्यात आली होती. मध्यरात्री पासून सुरू झालेल्या कार्यक्रमात प्रार्थना, भजन, गीत व प्रवचन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. फादर मॅथ्यू यांच्या मार्गदर्शनात फादर लिजू ॲन्थोनी, फादर सेबेस्टियन, अन्थोनी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
***
उमरेड येथे मानव मुक्तिदिन
उमरेड : स्थानिक तहसील कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ मानवतावादी संस्कृती वाहक संघाच्यावतीने मानव मुक्तिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी डॉ. पारस शंभरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जैबुन्निसा शेख, कृष्णा सरोदे, ॲड. अर्चना बागडे, ॲड प्रबुद्ध सुखदेवे, राकेश बावनगडे, पुष्पा कारगावकर आदी उपस्थित होते. संचालन डॉ. सी. जी. पाटील यांनी केले तर, प्रास्ताविक ॲड. दीपक मुनघाटे यांनी केले. अर्चना बागडे यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी राजकुमार चहांदे, विश्वनाथ शंभरकर, सुरेश मेश्राम, इंद्रपाल गजघाटे, यशोदा कांबळे, उषाकिरण गायकवाड, शशीकला म्हैसकर, रमेश देशमुख, मंगेश गजभिये, रमेश मेंढे आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: 28 ... Umred ... Single

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.