ईशान्येत रेल्वे मार्गांसाठी २८ हजार कोटी -मोदी
By Admin | Updated: December 1, 2014 23:47 IST2014-12-01T23:47:03+5:302014-12-01T23:47:03+5:30
ईशान्येकडील राज्यांशी संपर्क वाढविण्याच्या प्रयत्नांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी या भागातील नव्या रेल्वेमार्गांसाठी २८ हजार कोटी रुपये

ईशान्येत रेल्वे मार्गांसाठी २८ हजार कोटी -मोदी
कोहिमा : ईशान्येकडील राज्यांशी संपर्क वाढविण्याच्या प्रयत्नांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी या भागातील नव्या रेल्वेमार्गांसाठी २८ हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली़ या भागांतील पर्यटनास चालना देण्यावर केंद्र सरकारचा भर राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली़
नागालँडच्या सर्वांत मोठ्या वार्षिक हॉर्नबिल महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मोदी बोलत होते़ टू जी मोबाईल सेवेसाठी केंद्राने पाच हजार कोटी रुपये दिले आहेत़ याद्वारे ईशान्य भारतात दूरसंचार विकास योजनांचा प्रारंभ होऊ शकेल, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले़
मोदी म्हणाले की, देश-विदेशातून ईशान्येकडील राज्यांत मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात़ या भागात पर्यटनाला भरपूर वाव आहे़; पण यासाठी वाहतूक आणि संपर्क व्यवस्था सुधारण्याची गरज आहे़ रस्ते, रेल्वेमार्ग, विमानसेवा असेपर्यंत पर्यटनाचा विकास अशक्य आहे़ त्याचमुळे या भागातील एक नवा रेल्वे प्रकल्प आणि १४ नव्या रेल्वे मार्गांसाठी २८ हजार कोटी रुपये दिले जातील़
(वृत्तसंस्था)