२७... हद्दपार
By Admin | Updated: December 27, 2014 23:38 IST2014-12-27T23:38:43+5:302014-12-27T23:38:43+5:30
हद्दपार आरोपीस अटक

२७... हद्दपार
ह ्दपार आरोपीस अटकदहेगाव परिसरात पकडले : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईनागपूर : नागपूर शहर आणि जिल्ह्यातील दोन वर्षांसाठी हद्दपार केलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव शिवारात शुक्रवारी मध्यरात्री करण्यात आली.आम्रपाल ऊर्फ हनुमान ब्रह्मानंद पाटील (२३, रा. कळमना, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपीच्या विरोधात मालमत्तेविषयक गुन्ह्याची नोंद आहे. शिवाय, त्याला घरफोड्या करण्याची सवय असल्याने नापूर शहर परिमंडळ - ३ चे पोलीस उपायुक्त संजय दराडे यांनी त्याला नागपूर शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते.दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना त्यांना हनुमान हा दहेगाव परिसरात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने त्याला घेराव केला आणि ताब्यात घेतले. त्याच्याकडून खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही घरफोड्या उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या प्रकरणी त्याला मुंबई पोलीस कायदा कलम १४२ अन्वये अटक करण्यात आली. ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, अविनाश राऊत, दिलीप लांजेवार, मुुदस्सर, राधेश्याम कांबळे, रशीद शेख, मंगेश डांगे आदींनी बजावली. (प्रतिनिधी)***