26/11 सारखा हल्ला टळला, दहशतवाद्यांच्या बोटीला जलसमाधी

By Admin | Updated: January 2, 2015 19:08 IST2015-01-02T17:34:38+5:302015-01-02T19:08:31+5:30

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न असल्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट भारतीय सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे टळला आहे.

Like 26/11, the attack was over, the terrorists got water | 26/11 सारखा हल्ला टळला, दहशतवाद्यांच्या बोटीला जलसमाधी

26/11 सारखा हल्ला टळला, दहशतवाद्यांच्या बोटीला जलसमाधी

ऑनलाइन लोकमत 
अहमदाबाद, दि. 2  - मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न असल्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट भारतीय सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे टळला आहे. अजमल कसाब व त्याच्या साथीदारांनी ज्या प्रकारे भारतात प्रवेश केला त्याच पद्धतीने भारतात घुसखोरी करणारी दहशतवाद्यांची बोट भारतीय तटरक्षक दलाने शुक्रवारी थांबवली. मात्र, वरकरणी मच्छिमारांची बोट वाटत असलेल्या या बोटीवर आत्मघातकी स्फोट घडवण्यात आले आणि त्यानंतरच या बोटीवर प्रचंड स्फोटकांचा साठा व सहा ते सात दहशतवादी होते हे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले. या प्रकारामुळे गुजरात अथवा मुंबईतील बड्या शहरावर २६/११च्या प्रकारचा कट उधळला गेला असल्याच्या अंदाजाला पुष्टी मिळत आहे. शुक्रवारी पहाटे झालेल्या या प्रकारानंतर दहशतवाद्यांसह ही बोट बुडाली असून भारतीय सुरक्षा रक्षक जास्तीत जास्त अवशे, गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर रोजी अशी खबर मिळाली होती की कराची बंदरामधून अरबी समुद्रात भारतविरोधी कारवाया करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी हवाई पाहणी केली असता पोरबंदरपासून ३६५ किलोमीटर अंतरावर सदर बोट दृष्टीपथास आली. तटरक्षक दलाच्या बोटींनी या बोटीचा माग काढला आणि सत्य जाणण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय जवानांच्या हाती सापडू नये म्हणून डाव फसलेल्या अतिरेक्यांनी स्फोट घडवून आणला.
भारतीय जवानांनी बोटीला थांबण्याचा इशारा केल्यानंतर बोटीने पळ काढला आणि सुमारे तासभराच्या पाठलागानंतर भारतीय जवानांच्या हातून सुटका शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर आत्मघातकी मार्ग स्वीकारण्यात आला.. काही वृत्तवाहिन्यांच्या वृत्तानुसार भारतीय सुरक्षारक्षकांनी बोटीवरील दहशतवादी व त्यांचे पाकिस्तानातील हँडलर यांचे टेलीफोनवरील संभाषण ऐकले आणि त्यांना या कटाची पूर्ण कल्पना आली.
बोटीवरील अतिरेक्यांच्या घरी पाच लाख रुपये पोचवण्यात आले असल्याचे तसेच आम्हाला शस्त्रे मिळाली असल्यासारखे संदेश भारतीय सुरक्षा रक्षकांना मिळाले असल्याचे वृत्त आहे, त्यामुळे या बोटीवर दहशतवादीच होते व ते भारतात घातपाती कारवाया करण्यासाठीच घुसत होते हे स्पषट होत असल्याचे तजंज्ञांचे म्हणणे आहे.
२६/११ सारखा भारतावरचा होणार हल्ला टाळण्यात भारतीय सुरक्षा दलांना यश आले असल्याचा दावा संरक्षण तज्ज्ञांनी केला आहे.

 

Web Title: Like 26/11, the attack was over, the terrorists got water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.