मनपाच्या २६००विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
By Admin | Updated: August 10, 2015 23:28 IST2015-08-10T23:28:22+5:302015-08-10T23:28:22+5:30
नागपूर : जेसीआय नागपूर मेट्रोतर्फे शालेय विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली. यात मनपा शाळातील २६०० विद्यार्थ्यांसह ५२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

मनपाच्या २६००विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
न गपूर : जेसीआय नागपूर मेट्रोतर्फे शालेय विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली. यात मनपा शाळातील २६०० विद्यार्थ्यांसह ५२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षेत मनपा शाळातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय प्रदर्शन केल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती गोपाल बोहरे व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी सोमवारी दिली.मागील तीन वर्षापासून मनपा शाळातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होत आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येते. याचा त्यांना झोन स्तरावरील परीक्षेत लाभ होतो. झोन स्तरावरील २०० विद्यार्थ्यांतून तीन गुणवान विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना पुरस्कार दिला जातो. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला ५ हजाराचे बक्षीस व पुढील शिक्षणासाठी संस्थेकडून मदत केली जाते, अशी माहिती ठाकरे यांनी दिली. यावेळी जेसीआयचे आनंद शर्मा, एकता झोडापे, उषा ढोक आदी पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)