ज्वारी,बाजरी व मका खरेदीसाठी २६ केंद्र आधारभूत किंमत घोषित : राज्य शासनाची मान्यता

By Admin | Updated: November 4, 2015 23:29 IST2015-11-04T23:29:08+5:302015-11-04T23:29:08+5:30

जळगाव : राज्य शासनाने सन २०१५/१६ या खरीप पणन हंगामातील ज्वारी, बाजरी व मका हे भरडधान्य आधारभूत किंमत योजनेतंर्गत खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात २६ ठिकाणी भरडधान्य केंद्रांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

26 central support price for procurement of sorghum, bajra and maize: state government approval | ज्वारी,बाजरी व मका खरेदीसाठी २६ केंद्र आधारभूत किंमत घोषित : राज्य शासनाची मान्यता

ज्वारी,बाजरी व मका खरेदीसाठी २६ केंद्र आधारभूत किंमत घोषित : राज्य शासनाची मान्यता

गाव : राज्य शासनाने सन २०१५/१६ या खरीप पणन हंगामातील ज्वारी, बाजरी व मका हे भरडधान्य आधारभूत किंमत योजनेतंर्गत खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात २६ ठिकाणी भरडधान्य केंद्रांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा नियोजन भवनात झालेल्या पत्रकार परिषदेस खासदार ए.टी.पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके उपस्थित होते. खडसे म्हणाले की, ज्वारी, बाजरी व मका या धान्याच्या खरेदीसाठी १ नोव्हेंबर ते ३१ मार्च २०१६ याप्रमाणे तालुकास्तरावर केंद्रनिहाय खरेदी करण्यात येणार आहे. त्यात ज्वारी (संकरीत) प्रति क्विंटल १५७० रुपये, ज्वारी (मालदांडी) प्रति क्विंटल १५९० रुपये, मका प्रति क्विंटल १३२५ रुपये व बाजरी प्रति क्विंटल १२७५ रुपये भाव शासनाने निश्चित केलेला असल्याचे त्यांनी सांगितले.
धान या पिकाची आपल्याकडे लागवड नसल्यामुळे त्याचे केंद्र जळगावात सुरु करण्यात आलेले नाही. तसेच सोयाबिनचे केंद्र सुरु करण्याबाबत मागणीच न आल्याने हे केंद्र सुरु करण्यात आलेले नाही. मागणी आल्यानंतर तत्काळ केंद्र सुरु करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
या ठिकाणी होणार खरेदी
यावल तालुक्यातील हरीपुरा टी.डी.सी, रावेर तालुक्यातील पाल टी.डी.सी व लोहारा टी.डी.सी, चोपडा तालुक्यातील कर्जाणा टी.डी.सी., चोपडा तालुक्यातील सत्रासेन येथे हंंगाम खरेदी केंद्र सुरु होणार आहे. तसेच जळगाव तालुका शेतकी संघातर्फे, जळगाव व म्हसावद येथे, अमळनेर तालुका शेतकी संघ, चाळीसगाव तालुका शेतकी संघ, रावेर तालुका शेतकरी संघ, बोदवड तालुका शेतकी संघ, भुसावळ तालुका शेतकी संघ, मुक्ताईनगर तालुका शेतकी संघातर्फे कर्की, कोथळी व घोडसगाव येथे, यावल तालुका शेतकी संघ, चोपडा तालुका शेतकी संघ, पारोळा तालुका शेतकी संघ, एरंडोल तालुका शेतकी संघातर्फे एरंडोल, कासोदा व धरणगाव येथे, जामनेर तालुका शेतकी संघ, शेंदुर्णी सह जिनिंग ॲन्ड प्र., पाचोरा तालुका शेतकी संघ, भडगाव तालुका शेतकी संघात ही खरेदी होणार आहे.

Web Title: 26 central support price for procurement of sorghum, bajra and maize: state government approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.