आकोट येथील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २६ प्रकरणे आपसात
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:10+5:302015-02-14T23:52:10+5:30
आकोट : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशान्वये आकोट तालुका विधी सेवा समिती तथा विधिज्ञ मंडळ आकोट यांचे संयुक्त विद्यमाने १४ फेब्रुवारी रोजी येथील राष्ट्रीय लोक अदालत उपजिल्हा न्यायालय पार पडली. या लोक अदालतीमध्ये एकूण २६ प्रकरणे आपसात करण्यात आलीत.

आकोट येथील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २६ प्रकरणे आपसात
आ ोट : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशान्वये आकोट तालुका विधी सेवा समिती तथा विधिज्ञ मंडळ आकोट यांचे संयुक्त विद्यमाने १४ फेब्रुवारी रोजी येथील राष्ट्रीय लोक अदालत उपजिल्हा न्यायालय पार पडली. या लोक अदालतीमध्ये एकूण २६ प्रकरणे आपसात करण्यात आलीत.अध्यक्षपद तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुधाकर चव्हाण यांनी भूषविले. यावेळी दिवाणी न्यायाधीश मालवीय, सहदिवाणी न्यायाधीश मोरे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वानखडे, आकोट वकील संघाचे अध्यक्ष ॲड. गजानन बोचे, सचिव महेश देव तसेच वकील संघाचे सदस्य, निमंत्रित बँकेचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते बी.टी. धांडे, विजय जितकर, गुलाबराव वालसिंगे, ॲड. आर. आर. पळसपगार, ॲड. ऋचा ठाकूर, ॲड. शिल्पा धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील बँकेची वसुलीची १३८, एनआय ॲक्टची एकूण ११६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १२ प्रकरणे तडजोडीने आपसात करण्यात आलीत. त्यामध्ये २६ लाख ४१ हजार ५५७ रुपये एवढ्या रकमेची वसुली झाली. तसेच सेंट्रल बँक आकोट ४६, सेंट्रल बँक मुंडगाव १४, बँक ऑफ महाराष्ट्र आकोट १०, बँक ऑफ महाराष्ट्र पणज १३, बँक ऑफ महाराष्ट्र कुटासा २१, स्टेट बँक ऑफ इंडिया चोहोा ११, स्टेट बँक ऑफ इंडिया आकोट ७३, स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी शाखा ९५, स्टेट बँक ऑफ इंडिया आकोली जहाँ. ८२ अशी एकूण दाखलपूर्व ३६६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यांपैकी १४ प्रकरणे तडजोडीने आपसात निकाली करण्यात आलीत. यामध्ये ३ लाख २६ हजार २३८ रुपयांची वसुली करण्यात आली. या महालोक अदालतीच्या यशस्वितेसाठी वकील मंडळी, न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस कर्मचार्यांनी प्रयत्न केलेत. (तालुका प्रतिनिधी)....................