अमेठीत 257 जणांवर गुन्हा

By Admin | Updated: September 16, 2014 01:58 IST2014-09-16T01:58:15+5:302014-09-16T01:58:15+5:30

हिंसक घटनेनंतर काँग्रेसचे राज्यसभेचे सदस्य संजय सिंग यांचे चिरंजीव अनंत विक्रम सिंग व अन्य 257 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

257 offenders in Amethi | अमेठीत 257 जणांवर गुन्हा

अमेठीत 257 जणांवर गुन्हा

अमेठी : अमेठीचा राजमहाल भूपती भवनावर ताबा मिळविण्यावरून झालेल्या हिंसक घटनेनंतर काँग्रेसचे राज्यसभेचे सदस्य संजय सिंग यांचे चिरंजीव अनंत विक्रम सिंग व अन्य 257 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस व अनंत सिंग यांच्या समर्थकांदरम्यान झालेल्या चकमकीत पोलीस कॉन्स्टेबल विजय मिश्र हे मारले गेले होते तर सहाजण जखमी झाले होते.
जिल्हाधिकारी जगतराज तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत सिंगविरुद्ध कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याखेरीज विजयप्रताप सिंग, चिंटू कुमार, संजय सिंग, अवधेशसिंग, बिन्नू बारी व सुनील बारी यांच्याविरुद्ध तसेच 25क् अज्ञात व्यक्तींविरुद्ध 
गुन्हा दाखल करण्यात आला 
आहे.रविवारी झालेला गोंधळ हा अनंत सिंगमुळे झाल्याचे सांगून जिल्हाधिका:यांनी, अनंत सिंग हे संजय सिंग यांच्याकडून आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत होते, तर तीच बाब संजय सिंग अनंत सिंगांकरिता करीत होते. 
आपल्या पहिल्या पत्नीवर, गरिमावर आरोप करताना संजय सिंग यांनी, त्या अनंत सिंग या आपल्या मुलाचा वापर करीत असल्याचे म्हटले आहे. महालात कोण राहील याचा निवाडा कायदाच करेल असे ते म्हणाले आहेत. (वृत्तसंस्था)

 

Web Title: 257 offenders in Amethi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.