शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

बिहारमधील पुरामध्ये 253 जणांचा मृत्यू; 18 जिल्ह्यातील एक कोटींपेक्षा जास्त लोकांना पुराचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 8:45 AM

बिहारमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे राज्याला पुराचा तडाका बसला आहे.

ठळक मुद्दे बिहारमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे राज्याला पुराचा तडाका बसला आहे. या पुरामध्ये आत्तापर्यंत 253 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 18 जिल्ह्यातील एक करोड 26 लाख 87 हजार लोकांना या पुराचा फटका बसला आहे.बचावरकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

पटना, दि. 21- बिहारमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे राज्याला पुराचा तडाका बसला आहे. या पुरामध्ये आत्तापर्यंत 253 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 18 जिल्ह्यातील एक करोड 26 लाख 87 हजार लोकांना या पुराचा फटका बसला आहे. दरम्यान, तेथे बचावरकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

1152 जवान असलेल्या एनडीआरएफच्या 28 तुकड्या तसंच 118 बचाव बोटी, एसडीआरएफच्या 16 तुकड्या, 446 जवान आणि 92 बचाव बोटींकडून बचाव आणि मदत कार्य केलं जातं आहे. राज्य सरकारकडून पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचविण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आत्तापर्यंत जवळपास 7 लाख 21 हजार 704 लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. तेथे सुरू करण्यात आलेल्या 1 हजार 358 मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तब्बल ३.९२ कोटी लोकांनी आसरा घेतला आहे. एकुण 4 लाख 21 हजार 824 लोकांनी आश्रय घेतला आहे. जी लोक रहिवाली शिवारापर्यंत पोहचू शकत नाही अशांसाठी काही ठिकाणी समुदाय स्वयंपाक घर सुरू करण्यात आले आहेत. राज्यात एकुण 2569 सामुदायिक स्वयंपाकघर सुरू करण्यात आली असून त्यामध्ये 4 लाख 92 हजार 174 लोकांचं जेवण बनवलं जातं. काही भागातील पुराचं पाणी कमी होत असल्याचंही समजतं आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी पूर्व पंचारण जिल्ह्यातील सुरोली, बंजरिया, चिरेया, मधुबन तसंच पिपराही, सीतामढी जिल्ह्यातील रून्नीसेदपूर, मुज्जफरपूरमधील औराई, कटरा, मुसहरी आणि मुरोल, शिवहरमधील पुर क्षेत्र आणि पटना जिल्ह्यातील फतुहा, पुनपुन आणि मसोढीमधील पुरग्रस्त भाग या सगळ्या भागांची हवाई पाहणी केली. बिहारमधील 18 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणार पूर असल्याने रेल्वे वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला. 

आसामध्ये ही पावसाचं थैमान सुरूच आहे. तेथिल एकुण 19 लाख लोकांना पुराचा फटका बसल्याची माहिती मिळते आहे. उत्तर प्रदेशातील पावसात मृत्यू झालेल्यांचा आकडा 69 झाला आहे. 

बिहारच्या पुरातील मृतांचा आकडा 253अररिया जिल्ह्यात 57 जणांचा मृत्यूसीमामढीमध्ये 31जणांचा मृत्यू पश्चिम चंपारणमध्ये 29 जणांचा मृत्यू कटीहारमध्ये 23 जणांचा मृत्यू पूर्व पंचारणमध्ये 19 जणांचा मृत्यूमधुबनी, सुपोल तसंच मधेपुरामध्ये 13 जणांचा मृत्यू किशनगंजमध्ये 11 जणांचा मृत्यू दरभंगामध्ये 10  पूर्णियामध्ये 9 जणांचा मृत्यू गोपाजगंजमध्ये 8 जणांचा मृत्यू मुजफ्फरपूर, शिवहर तसंच सहरसामध्ये 44 जणांचा मृत्यू खगडियामध्ये 3 जणांचा मृत्यू सारणमध्ये एकाचा मृत्यू.