तिरुपती- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यासाठी मोदींनी 2500 कोटी दिले, तर आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीसाठी फक्त 1500 कोटींची तरतूद केली, असं चंद्राबाबू तिरुपती येथे म्हणाले आहेत. नरेंद्र मोदी लोकांना पोकळ आश्वासनं देतायत. मोदी जनतेला स्वर्ण आंध्र पाहिजे की स्कॅम आंध्र असं विचारत आहेत. तसेच स्वर्ण आंध्र हवा असल्यास भाजपाला मतदान करा, असं मोदी सांगत आहेत. परंतु आज त्यांनी एका भ्रष्टाचारी पक्षाबरोबर युती केली आहे, असं चंद्राबाबू म्हणाले आहेत. यावेळी चंद्राबाबू मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
गुजरातमध्ये पुतळ्यासाठी 2500 कोटी, तर अमरावतीला फक्त 1500 कोटी, चंद्राबाबूंचं मोदींवर टीकास्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 20:30 IST