शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

UAE मध्ये 25 अन् सौदीत 11 भारतीयांना फाशीची शिक्षा; सरकारने संसदेत आकडेवारी मांडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 22:02 IST

सध्या परदेशी तुरुंगात कैद असलेल्या भारतीय कैद्यांची संख्या 10,152 आहे.

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वीच शहजादी खान नावाच्या भारतीय महिलेला युएईमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या घटनेची भारतात खूप चर्चा झाली, तसेच सरकारविरोधात तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली. आता सरकारने गुरुवारी संसदेत UAE सह विविध देशांमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारतीय नागरिकांची यादी जाहीर केली आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. 

अनेक भारतीय वर्षानुवर्षे परदेशी तुरुंगात कैद आहेत. परदेशात मृत्युदंडाची शिक्षा मिळालेल्या भारतीयांचा तपशील आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी भारत सरकारने काय प्रयत्न केले? असा प्रश्न परराष्ट्र मंत्रालयाला विचारण्यात आला.

परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी दिली माहिती या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह म्हणाले, मंत्रालयाकडे उपलब्ध माहितीनुसार सध्या परदेशी तुरुंगात कैद असलेल्या भारतीय कैद्यांची संख्या 10,152 आहे. यावेळी मंत्र्यांनी 8 देशांशी संबंधित डेटा शेअर केला आणि फाशीची शिक्षा झालेल्या भारतीय नागरिकांची संख्याही सांगितली, परंतु अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

UAE मध्ये 25 भारतीयांना मृत्यूदंडाची शिक्षामिळालेल्या माहितीनुसार, UAE मध्ये 25 भारतीयांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय, सौदी अरेबियामध्ये 11, मलेशिया 6, कुवेत 3 आणि इंडोनेशिया, कतार, अमेरिका आणि येमेनमध्ये प्रत्येकी एका भारतीयाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परदेशातील भारतीय मिशन/पोस्ट परदेशातील न्यायालयांद्वारे मृत्युदंडासह विविध शिक्षा झालेल्या भारतीय सरकारी वकील पुरवणे, संबंधित एजन्सींकडे त्यांच्या खटल्यांचा पाठपुरावा करणे, अपील, दया याचिका इत्यादींसह विविध कायदेशीर उपाय शोधण्यात मदत केली जाते.

किती भारतीयांना फाशी झाली?कीर्ती वर्धन सिंह म्हणाले की, मलेशिया, कुवेत, कतार आणि सौदी अरेबियामध्ये अशा प्रकारच्या शिक्षा देण्यात आल्या आहेत. 2024 मध्ये कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये प्रत्येकी तीन भारतीय नागरिकांना फाशी देण्यात आली आहे. 2023 मध्ये कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये प्रत्येकी पाच भारतीयांना मृत्युदंडाची शिक्षा दिली, तर मलेशियामध्ये एका भारतीयाला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. 

टॅग्स :United Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारParliamentसंसद