नक्षलवादी प्रमुखावर अडीच कोटींचे बक्षीस
By Admin | Updated: September 17, 2014 03:03 IST2014-09-17T03:03:52+5:302014-09-17T03:03:52+5:30
विविध राज्य सरकारांनी सीपीआय (माओ) प्रमुख मुपाल्ला लक्ष्मणराव ऊर्फ गणपतीवरील बक्षिसात घसघशीत वाढ केल्याने त्याच्या शिरावर 2.67 कोटी रुपयांचे बक्षीस झाले

नक्षलवादी प्रमुखावर अडीच कोटींचे बक्षीस
मोस्ट वाँटेडमध्ये गणती : केंद्र सरकारही वाढविणार रक्कम
नवी दिल्ली : विविध राज्य सरकारांनी सीपीआय (माओ) प्रमुख मुपाल्ला लक्ष्मणराव ऊर्फ गणपतीवरील बक्षिसात घसघशीत वाढ केल्याने त्याच्या शिरावर 2.67 कोटी रुपयांचे बक्षीस झाले असून, तो देशातील ‘मोस्ट वाँटेड’ पैकी एक ठरला आहे.
अलीकडे सर्व केंद्रीय समिती सदस्यांवर 21 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सीपीआय (माओ) ही सर्वाधिक बक्षीस लावली गेलेली संघटना झाली आहे. माओवाद्यांबद्दलची माहिती प्राप्त करण्यासाठी आणि गणपतीला अटक करण्यासाठी सीपीआय (माओ) प्रमुखावरील बक्षीस वाढविण्यास सरकारने राष्ट्रीय तपास संस्थेला सांगितले आहे, असे गृहमंत्रलयाच्या सूत्रंनी सांगितले. एनआयएचे सध्या गणपतीच्या शिरावर 15 लाख रुपयांचे बक्षीस आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
महाराष्ट्रासह इतरही राज्ये मागावर
4गेल्या महिन्यात महाराष्ट्र सरकारने गणपतीच्या अटकेसाठी एक कोटी रुपयांची घोषणा केली. त्यानंतर गणपतीवर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर बक्षीस असल्याचे दिसून आले.
4गणपतीला अटक करणा:याला एक कोटी रुपये देण्याचे छत्तीसगड सरकारने वचन दिले आहे. याशिवाय इतर नक्षलप्रभावित राज्यांनी बक्षिसे जाहीर केली आहेत. ही सर्व रक्कम मिळून 2.67 कोटी रुपये झाली आहे.