धरणात २४.९१ टक्के साठा महान: पाचपैकी दोन व्हॉल्व पडले उघडे

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:15+5:302015-02-13T23:11:15+5:30

महान: नदीकाठच्या ५५ गावांसह अकोला शहरातील नागरिकांची तहान भागविणार्‍या महान येथील धरणात २४.९१ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. धरणाचे पाचपैकी दोन व्हॉल्व उघडे पडले आहेत.

24.9 1 percent of reservoirs in the dam are great: two out of five valves fell open | धरणात २४.९१ टक्के साठा महान: पाचपैकी दोन व्हॉल्व पडले उघडे

धरणात २४.९१ टक्के साठा महान: पाचपैकी दोन व्हॉल्व पडले उघडे

ान: नदीकाठच्या ५५ गावांसह अकोला शहरातील नागरिकांची तहान भागविणार्‍या महान येथील धरणात २४.९१ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. धरणाचे पाचपैकी दोन व्हॉल्व उघडे पडले आहेत.
यंदा अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने धरण १०० टक्के भरले नाही. महान धरणातून अकोला शहर आणि परिसरातील ५५ गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. धरण पूर्ण न भरल्याने यंदा पाणलोट क्षेत्रातील परवानाधारक शेतकर्‍यांना रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यात आले नाही. अकोला शहराला पाणीपुरवठा होण्यासाठीच धरणातील साठा आरक्षित करण्यात आला. दगडपारवा येथील धरणातील साठा मूर्तिजापूर शहरवासीयांची तहान भागावी, यासाठी आरक्षित करण्यात आला. दगडपारवा येथील धरणात ० टक्के पाणी असल्याने महान येथील धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. हे पाणी खांबोरापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. तेथून मोटारपंपाद्वारे मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. धरणाची देखभाल उपविभागीय अधिकारी सोळंके, शाखा अभियंता ए.ए.सैयद, एस.व्ही. जानोरकर, आर.एस. पिंपळकर, एम.एच. पाठक, अब्दुल अजीज करीत आहेत. (वार्ताहर)
बॉक्स...
गतवर्षीच्या तुलनेने साठ्यात घट
गत वर्षीच्या तुलनेने यंदा धरणातील साठा घटला आहे. गतवर्षी १२ फेब्रुवारी रोजी धरणातील साठा ५६.०१ टक्के आणि यंदा १२ फेब्रुवारी रोजी धरणातील साठा २४.९१ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेने यंदा साठा ३१ टक्के एवढा कमी आहे. १२ फेब्रुवारी २०१५ रोजी धरणातील पाण्याची पातळी ११२०.५६ फूट असून, ३४१.५५ मीटर एवढी आहे. धरणात २१.५११ द.ल.घ.मी. एवढे पाणी आहे.
बॉक्स...
तीन व्हॉल्व पाण्यात
जिल्‘ात महान धरण सर्वात मोठे आहे. धरणाला दहा गेट असून, पाच व्हॉल्व आहेत. यापैकी सद्यस्थितीत तीन व्हॉल्वच पाण्यात बुडाले आहेत. पाण्याअभावी विश्रामगृहाकडील टेकड्या उघड्या पडल्याचे दिसत आहे.
फोटो:- १४सीटीसीएल १०: महान धरणातील साठा.

Web Title: 24.9 1 percent of reservoirs in the dam are great: two out of five valves fell open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.