शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

गतवर्षीच्या आत्महत्यांत मजुरांचे प्रमाण २४ टक्के; तामिळनाडू प्रथम, तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 05:48 IST

Suicide cases in last year : २०२० साली देशात १,५३,०५३ लोकांनी आत्महत्या केली. त्यातील ३७,६६६ लोक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण २४.६ टक्के आहे.

नवी दिल्ली : गेल्या वर्षी आत्महत्या करणाऱ्यांपैकी २४ टक्के लोक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. सात वर्षांपूर्वी जितक्या मजुरांनी आत्महत्या केली होती त्यापेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. देशात मजुरांनी सर्वाधिक आत्महत्या तामिळनाडूमध्ये केल्या असून त्यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा व गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो. २०२० साली देशात १,५३,०५३ लोकांनी आत्महत्या केली. त्यातील ३७,६६६ लोक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण २४.६ टक्के आहे. गेल्या काही वर्षांत मजुरांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यात गेल्या वर्षी कोरोना साथीमुळे स्थिती आणखी बिघडली होती. २०१४ साली आत्महत्या केलेल्यांपैकी १२ टक्के लोक मजूर होते. हे प्रमाण २०१५ साली १७.८ टक्के, २०१६ मध्ये १९.२ टक्के, २०१७ मध्ये २२.१ टक्के, २०१८ मध्ये २२.४ टक्के, २०१९ मध्ये २३.४ टक्के इतके होते. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०२० साली तामिळनाडूमध्ये ६,४९५ मजुरांनी आत्महत्या केली होती. तर, मध्य प्रदेशमध्ये ४,९४५, महाराष्ट्रात ४,१७६, तेलंगणामध्ये ३,८३१ व गुजरातमध्ये २,७५४ मजुरांनी आत्महत्या केली आहे. अपघातांमुळे होणारे मजुरांचे मृत्यू व आत्महत्या करणारे मजूर यांची वेगवेगळी नोंद ठेवण्यास एनसीआरबीने २०१४ सालापासून सुरुवात केली. देशात आत्महत्या करणाऱ्या नोंदीची नऊ गटात विभागणी करण्यात येते. रोजंदारीवरील मजुरांप्रमाणेच गृहिणी, शेतकरी, पगारदार तसेच व्यावसायिक, उद्योजक, सेवानिवृत्त याचबरोबर इतर काही गटांतील लोकांच्या आत्महत्यांची स्वतंत्र नोंद करण्यात येते.

आत्महत्या केलेल्या गृहिणींचे प्रमाण १४ टक्केव्यवसायानुरूप विचार केला तर देशात रोजंदारीवरील मजुरांनी सर्वाधिक आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर अन्य व्यक्तींनी आत्महत्या करण्याचे प्रमाण गृहिणी (१४.६ टक्के), स्वत:चा व्यवसाय असलेले (११.३ टक्के), बेरोजगार (१०.२ टक्के), पगारदार व्यक्ती (९.७ टक्के), विद्यार्थी (८ टक्के), शेतकरी (७ टक्के), सेवानिवृत्त (१ टक्का) व इतर गट (१३.४ टक्के) असे आहे. बेरोजगार व्यक्तींनी आत्महत्या करण्याचे प्रमाण २०१९ रोजी १०.१ टक्के होते ते २०२० साली १०.२ टक्के झाले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTamilnaduतामिळनाडू