- चंद्रशेखर बर्वे नवी दिल्ली - नवरा आणि सासरच्या जाचामुळे खचलेल्या २४ हजार ४८ महिलांनी आत्महत्या केली असल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. २०२३ मध्ये एकूण ४६,६४८ महिलांनी आत्महत्या केल्या होत्या. यातील जवळपास ५० टक्के महिलांनी नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध आणि सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्या, हे येथे उल्लेखनीय.
महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी आत्महत्या केल्यामुळे नवरा आणि सासरच्यांकडून सुनांचा जो छळ होतो तो मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी, पुण्याच्या वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली होती. हगवणे यांना मृत्यूपूर्वी क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती, असे शवविच्छेदन अहवालातून पुढे आले होते.
राष्ट्रीय क्राइम रेकॉर्ड ब्युरो अहवालातील माहितीराजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या लेकींचा श्वास घरातच गुदमरायला लागला आहे.नवरा आणि सासरच्या असह्य त्रासामुळे २०२३ मध्ये महाराष्ट्रातील २,३७३ सुनांनी जगण्यापेक्षा आत्महत्या करून जीवन संपविण्याचा मार्ग निवडला आहे. महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी ही माहिती राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) २०२३च्या अहवालातून पुढे आली आहे.
Web Summary : In 2023, nearly 24,000 Indian women died by suicide due to marital and in-law harassment, with Maharashtra reporting 2,373 deaths. NCRB data highlights the alarming trend of women facing domestic distress, prompting renewed concerns over dowry-related abuse following recent high-profile cases.
Web Summary : 2023 में, लगभग 24,000 भारतीय महिलाओं ने वैवाहिक और ससुराल वालों के उत्पीड़न के कारण आत्महत्या कर ली, महाराष्ट्र में 2,373 मौतें हुईं। एनसीआरबी के आंकड़ों में घरेलू संकट का सामना कर रही महिलाओं की खतरनाक प्रवृत्ति को उजागर किया गया है, जिससे हाल के हाई-प्रोफाइल मामलों के बाद दहेज से संबंधित दुर्व्यवहार पर चिंताएं बढ़ गई हैं।