शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
4
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
5
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
6
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
7
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
8
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
9
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
10
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
11
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
13
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
14
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
15
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
16
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
17
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
18
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
19
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
20
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत

‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 05:35 IST

भाजप-जदयूची सर्व १०१ नावे घोषित, मित्रपक्षांचेही उमेदवार ठरले; भाजपकडून १६ ठिकाणी युवा उमेदवार; ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर 

- एस. पी. सिन्हालोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : बिहारमध्ये २४३ जागांसाठी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए)  आतापर्यंत २३७ उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजप-जनता दल युनायटेडने आपले प्रत्येकी १०१ उमेदवार जाहीर केले असून, ‘हम’ व रालोमो या मित्रपक्षांनी आपल्या वाट्याच्या प्रत्येकी ६ उमेदवारांची नावे जाहीर केली. चिराग पासवान यांच्या लोजपा (रामविलास) यांच्या पक्षाने आतापर्यंत १५ उमेदवार जाहीर केले आहेत.एनडीएच्या जागावाटपात भाजप व जदयू यांना समान १०१ जागा आल्या आहेत. चिराग पासवान यांच्या लोजपाला २९, जीतनराम मांझी यांच्या ‘हम’ आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी ६ जागा आल्या आहेत. 

जदयूने पहिल्या यादीत ५७ उमेदवार जाहीर केले होते. गुरुवारी ४४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत एकही अल्पसंख्याक उमेदवार नसल्याने प्रचंड चर्चा झडली होती. आता दुसऱ्या यादीत चार अल्पसंख्याक उमेदवारांचा पक्षाने समावेश केला आहे. इंडिया आघाडीने अद्याप  उमेदवार जाहीर केलेला नाहीत.

भाजपने १६ आमदारांची तिकिटे कापलीभाजपने यंदाच्या निवडणुकीत १६ विद्यमान आमदारांची तिकिटे कापली आहेत. पक्षाने बहुतांश युवा उमेदवार मैदानात उतरवले आहेत. ‘जेन-झी’ मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने रणनीती आखली असून, अनेक ठिकाणी नवे चेहरे दिले आहेत. यात मिश्रीलाल यादव यांच्या जागेवर गायिका मैथिली ठाकूर, तर स्वर्णासिंह यांच्या जागी त्यांचे पती सुजितसिंह यांना उमेदवारी दिली आहे. २० वर्षांपासून आमदार असलेले अरुण सिन्हा यांच्याऐवजी संजय गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे.

अमित शाह पाटण्यात दाखलकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसांच्या दौऱ्यावर पाटण्यात दाखल झाले असून, या काळात त्यांच्या विविध मतदारसंघांत प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : NDA Announces 237 Candidates; Campaigning Gains Momentum in Bihar

Web Summary : NDA declared 237 candidates for Bihar elections. BJP and JDU announced 101 candidates each, while HAM and RLSP declared six each. LJP has announced 15. BJP replaced 16 sitting MLAs, focusing on youth and new faces. Amit Shah arrived in Patna for campaign rallies.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५