शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

रेल्वेच्या १.२७ लाख पदांसाठी २.३७ कोटी अर्ज; दोन वर्षांत दुसरी मोठी भरती मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 01:16 IST

भारतीय रेल्वेने १.२७ लाख पदांची भरती सध्या सुरू केली असून, त्यासाठी २.३७ कोटी अर्ज आले आहेत. या भरतीपोटी रेल्वेला ८00 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ही जगातील सर्वांत मोठ्या नोकरभरती मोहिमांपैकी एक मोहीम ठरली आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने १.२७ लाख पदांची भरती सध्या सुरू केली असून, त्यासाठी २.३७ कोटी अर्ज आले आहेत. या भरतीपोटी रेल्वेला ८00 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ही जगातील सर्वांत मोठ्या नोकरभरती मोहिमांपैकी एक मोहीम ठरली आहे.भारतीय रेल्वेकडून दोन वर्षांत दुसऱ्यांदा अशी मोठी भरती केली जात आहे. असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन, गँगमन आणि ट्रॅकमन अशा विविध पदांसाठी ही भरती केली जात आहे. या भरतीसाठी आॅनलाइन परीक्षा घेतली जात आहे. या पदांसाठी आलेल्या अर्जांची संख्या २0१८ मध्ये सीबीएसईची दहावीची परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांच्या तुलनेत १५ पट अधिक आहे.जास्तीतजास्त लोकांना अर्ज करता यावा यासाठी रेल्वेने या पदांच्या भरतीसाठीच्या अटी आणि शर्ती शिथिल केल्या आहेत. ग्रुप डी पदासाठी आधी आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक होते. त्याऐवजी आता दहावी उत्तीर्ण अशी अट ठेवण्यात आली आहे. याच ग्रुपसाठी वयाची मर्यादा २८ वरून ३१ वर्षे करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गेल्या वर्षीच या अटी शिथिल करण्याची घोषणा केली होती.रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, सुरक्षा श्रेणीतील रिक्त जागा भरणे आमच्यासाठी आवश्यक आहे. आमच्या सेवा कित्येक पटींनी वाढल्या आहेत. देखभालीवरील दबावहीत्याच प्रमाणात वाढला आहे. ही महाभरती त्यामुळेच हाती घेण्यात आली आहे.अशी आहे रेल्वेची महाभरतीसध्याची कर्मचारीसंख्या : १२.५ लाखएकूण रिक्तपदे : २ लाखभरली जात असलेलीपदे : १.२७ लाखपरीक्षा केंद्रे : ४४0 (११६ शहरांत)परीक्षा कालावधी :६0 दिवस (दररोज५ लाख जणपरीक्षा देणार)

टॅग्स :railwayरेल्वे