झोपेतील प्रवाशांचा २.३६ लाखांचा मुद्देमाल लंपास
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:17+5:302015-02-13T00:38:17+5:30
झोपेतील प्रवाशांचा २.३६ लाखांचा मुद्देमाल लंपास

झोपेतील प्रवाशांचा २.३६ लाखांचा मुद्देमाल लंपास
झ पेतील प्रवाशांचा २.३६ लाखांचा मुद्देमाल लंपासगुन्हा दाखल : संघमित्रा, समरसता एक्स्प्रेसमधील घटनानागपूर : रेल्वे प्रवासात गाढ झोपी गेल्याचा फटका दोन प्रवाशांना बसला. त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन संघमित्रा एक्स्प्रेस आणि समरसता एक्स्प्रेसमध्ये अज्ञात आरोपीने गुरुवारी त्यांचे दागिने आणि रोख असा एकूण २.३६ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.रेल्वे प्रवासात प्रवाशांचे दागिने, महागडे साहित्य पळविणारी टोळी सक्रिय झाली आहे. प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन चोरटे त्यांचे साहित्य लंपास करीत आहेत. गुरुवारी रेल्वेगाडी क्रमांक १२१५१ समरसता एक्स्प्रेसने (बी-३, ४२, ४५, ४६) संजय घुमनमल वासवानी (४०) रा. जरीपटका हे व्यावसायिक आपल्या कुटुंबासह कल्याण ते नागपूर असा प्रवास करीत होते. बडनेरा रेल्वेस्थानक येण्यापूर्वी सकाळी ८ वाजता ते झोपेतून जागे झाले. त्यांना आपल्या बर्थवर ठेवलेली हॅन्डबॅग दिसली नाही. त्यांनी इकडेतिकडे हॅन्डबॅगचा शोध घेतला, परंतु ती कुठेच आढळली नाही. त्यात सोन्याची चेन किंमत ४५ हजार, दुसरी सोन्याची चेन किंमत १७ हजार, सोन्याचा पेंडालचा सेट किंमत ३० हजार, कानातील टॉप्स किंमत १७ हजार, सोन्याच्या ३ अंगठ्या किंमत ३६ हजार, दोन मोबाईल किंमत ३५ हजार ५०० रुपये, आर्टिफिशियल ज्वेलरी किंमत १ हजार असा एकूण १ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल होता. दुसऱ्या घटनेत रेल्वेगाडी क्रमांक १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेसने डॉ. सुजाता शुद्धोधन जामगडे (२६) रा. शीलानगर गिट्टीखदान या एस-१०, बर्थ ७१ वरून पाटणा ते नागपूर असा प्रवास करीत होत्या. पहाटे ५ वाजता त्या अलाहाबाद रेल्वेस्थानक येण्यापूर्वी झोपेतून जाग्या झाल्या. त्यांना आपली हॅन्डबॅग बर्थवर दिसली नाही. त्यात सोनी कंपनीचा मोबाईल किंमत २४ हजार, सोन्याची चेन किंमत १९ हजार ५००, रोख ५ हजार असा एकूण ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल होता. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)