शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

२३ वर्षीय मुदसिरने आखली पुलवामा हल्ल्याची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 06:01 IST

पुरविले वाहन, स्फोटके; एनआयएकडून शोध सुरू

श्रीनगर : जैश-ए-मोहम्मदचा फारसा परिचित नसलेला २३ वर्षे वयाचा व व्यवसायाने इलेक्ट्रिशयन असलेला दहशतवादी मुदसिर अहमद खान उर्फ मोहम्मद भाई याने पुलवामा हल्ल्याची योजना आखली होती. फरारी असलेल्या मुदसिरचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कसून शोध घेत आहे.१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या या हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, मुदसिर हा पदवीधर असून त्याने आत्मघाती हल्ला घडविण्यासाठी आदिल या दहशतवाद्याला वाहन व स्फोटके मिळवून दिली होती. त्राल येथील मिर मोहल्ला येथे राहणारा मुदसिरने दोन वर्षांपूर्वी जैश-ए-मोहम्मदसाठी भूमिगत राहून काम करत होता. त्यानंतर त्या संघटनेच्या नूर मोहम्मद तंत्री या दहशतवाद्याच्या गटात तो सक्रिय झाला. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया घडविण्यात नूरचा मोठा हात होता. डिसेंबर २०१७ मध्ये तंत्री चकमकीत मारला गेल्यानंतर मुदसिर अहमद खान १४ जानेवारी २०१८ रोजी घरातून पळून गेला. त्यावेळेपासून त्याने दहशतवादी कारवायाही वाढविल्या.आणखी दोन हल्ल्यांतही सामीलमुदसिर याने पदवी मिळविल्यावर आयटीआयमधून त्याने इलेक्ट्रिशियनचा एक वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातसंजावान येथे लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागेही त्याचा हात होता.या हल्ल्यात सहा जवान शहीद व एक नागरिक ठार झाला होता. लेथपोरा येथे सीआरपीएफ तळावर जानेवारी २०१८मध्ये झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. या प्रकरणीही तपासयंत्रणांना तो हवा आहे.पुलवामातील हल्ल्याच्या चौकशीसाठी एनआयएच्या पथकाने २७ फेब्रुवारी रोजी मुदसिरच्या घरावर धाड टाकली होती. या हल्ल्याच्या कटातील सज्जाद भट या दहशतवाद्याचाही शोध सुरू आहे.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला