२३... सारांश... जोड
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:21+5:302015-01-23T23:06:21+5:30
स्मशनभूमीची दुरवस्था

२३... सारांश... जोड
स मशनभूमीची दुरवस्थामेंढाला : हल्ली स्थानिक स्मशानभूमीची दुरवस्था झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गावाबाहेर असलेल्या नाल्याच्या काठावर काही वर्षांपूर्वी शेड तयार करण्यात आले होते. ते आता मोडकळीस आले आहे. या ठिकाणी सोई उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.***सार्वजनिक विहिरींचे पुनर्भरण करानरखेड : तालुक्यातील बहुतांश गावांमधील सार्वजनिक विहिरीत देखभाल व दुरुस्ती अभावी मोडकळीस आल्या आहेत. उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेत या हिवहिरींची दुरुस्ती करून त्यांचे रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पुनर्भरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.***पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करानागपूर : पोलीस पाटील हा नागरिक व पोलीस यांच्यातील दुवा आहे. सध्या पोलीस पाटलांना अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. वाढत्या महागाईचा विचार केल्यास ते मानधन अपुरे पडते. त्यामुळे त्यात वाढ करण्याची मागणी जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी केली आहे. ***संरक्षक कठडे लावण्याची मागणीकोदामेंढी : मौदा तालुक्यातील बहुतांश पुलांचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत. त्यामुळे या पुलांवर अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या पुलांचे सर्वेक्षण करून त्यावर संरक्षक कठड्यांची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.***कन्हान येथे महिला मेळावाकन्हान : स्थानिक नारद दारोडे व मित्र परिवाराच्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नवनिर्वाचित सर्व नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू व रांगोळी स्पर्धेचेही आयोजन केले होते. यात शहरातील विविध समस्यांवर विचारविमर्श करण्यात आला. कार्यक्रमाला नगरसेवकांसह नागरिक उपस्थित होते. ***