२३... सारांश

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:17+5:302015-01-23T23:06:17+5:30

सालई येथे भारत माता पूजन

23 ... summary | २३... सारांश

२३... सारांश

लई येथे भारत माता पूजन
पारशिवनी : तालुक्यातील सालई येथे भारत माता उत्सव समितीच्यावतीने भारत मातेचे पूजन कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन करण्यात आले आहे. यात तरुण पिढी व भारतीय संस्कृती यावर मार्गदर्शन केले जाईल. या प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
***
श्रीमद् भागवत व ज्ञानयज्ञ सप्ताह
धामना : नजीक च्या लाव्हा येथे मंगळवारपासून श्रीमद् भागवत व ज्ञानयज्ञ सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, विविध ण्धार्मिक कार्यक्रमांसोबतच साईबाबा पालखी सोहळ्याचेही आयोजन केले आहे. मंगळवारी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वितरण केले जाईल.सदर कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
***
रामटेक येथे महिला मेळावा
रामटेक : स्थानिक सोनार समाजाच्यावतीने महिला मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रवीणा मर्जिवे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रतिभा ढोमणे, विनया कुंभलकर उपस्थित होत्या. यावेळी हळदीकुंकू कार्यक्रम पार पडला. विविध स्पर्धांचे बक्षिसे वितरित करण्यात आले.
***
मौदा येथे वसंतपंचमी महोत्सव
मौदा : स्थानिक कन्हान नदीच्या द्वीपावर असलेल्या चक्रधरस्वामी मंदिरात शनिवारी वसंतपंचमी महोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त उटीस्नान, विडा, अवसर, उपहार, पंचकृष्ण पालखी, पूजा अवसर, महाप्रसाद, भजन, पाहुण्यांचे स्वागत आणि रात्री मनोहर मराठे व दादाराव उके यांचे कीर्तन पार पडणार आहे. या महोत्सवात दरवर्षी हजारो भाविक उपस्थित राहतात.
***
निहारवाणी येथे रंगारंग कार्यक्रम
निहारवाणी : मौदा तालुक्यातील निहारवाणी येथे शनिवारी मंडईचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त दिवसा दंडार व रात्रीला नाटकाचा प्रयोग, खडा तमाशा यासह अन्य रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
***
वाकोडी येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
बेला : नजीकच्या वाकोडी येथील सद्गुरू एकनाथ महाराज देवस्थानात वसंत पंचमीनिमित्त शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रम दोन दिवस चालणार आहेत. यानिमित्त अभिषेक, गुरुपूजा, कीर्तन आदी कार्यक्रम पार पडणार असून, सोमवारी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
***

Web Title: 23 ... summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.