२३... सावनेर

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:18+5:302015-01-23T23:06:18+5:30

(फोटो)

23 ... saubner | २३... सावनेर

२३... सावनेर

(फ
ोटो)
राम गणेश गडकरी यांना आदरांजली
विविध कार्यक्रमांचे आयोजन : स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावनेर : राम गणेश गडकरी यांच्या ९६ व्या पुण्यतिथीनिमित्त सावनेर शहरात शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे तसेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. प्रसंगी शहरातील नाट्यप्रेमी, साहित्यिक, लोकप्रतिनिधी, नागरिक व विद्यार्थ्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
राम गणेश गडकरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष वंदना धोटे, नगर परिषद उपाध्यक्ष सूरजकला सेवके, सभापती तेजसिंग सावजी, सुषमा दिवटे, रवींद्र ठाकूर, गटनेते ॲड. शैलेश जैन, मुख्याधिकारी सातोने, लक्ष्मीकांत दिवटे, विनोद खंगारे यांच्यासह अन्य मान्यवरांनी राम गणेश गडकरी यांच्या समाधीस्थळावर पुष्प अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
कै. राम गणेश गडकरी संघर्ष समिती तथा बहुद्देशीय संस्थेच्यावतीने स्थानिक गडकरी चौकात विविध कार्यक्रमांचेे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिनी मॅरेथॉन स्पर्धा, सायकल स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये शहरातील सर्वच शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. शिवाय, हास्य कविसंमेलनही पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार उमेश चौबे होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपअधीक्षक अमित काळे, वेकोलिचे उपक्षेत्रीय प्रबंधक आर. एस. सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी आत्राम, ठाणेदार शैलेश सपकाळ, ॲड. बरेठिया, आनंद ब्रम्होरे, डोमासाव सावजी, रामेश्वर रुषिया, किशोर ढुंढेले आदी उपस्थित होते. यावेळी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयंत कुळकर्णी यांचा सत्कारही करण्यात आला. (प्रतिनिधी)
***

Web Title: 23 ... saubner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.