२३... पारशिवनी.... माती
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:27+5:302015-01-23T23:06:27+5:30
(फोटो)

२३... पारशिवनी.... माती
(फ ोटो)नदीकाठी मातीचे अवैध उत्खननवीटभट्टी मालकांचा प्रताप : तामसवाडी गावाला पुराचा धोका उद्भवण्याची शक्यताविजय भुते ० पारशिवनी तालुक्यातील तामसवाडी शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या काठावर काही वीटभट्टी मालकांनी मोठ्या प्रमाणात खोदकाम करून माती विटा तयार करण्यासाठी नेण्याचा प्रकार चालविला आहे. त्यामुळे या गावाला भविष्यात पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार केली. मात्र, काहीही कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप नागरिकांनी केला. तामसवाडी शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विटांच्या भट्ट्या आहेत. या भट्ट्यांवर विटा तयार करण्यासाठी लागणारी माती ही याच परिसरातील वापरली जात असून, कन्हान नदीचे पाणी वापरले जाते. या परिसरात दोन वर्षांपूर्वीपर्यंत सीताफळाचे मोठे वनही होते. हल्ली या वीटभट्टी मालकांनी याच परिसरात अर्थात नदीच्या किनाऱ्यावर जेसीबीच्या मदतीने खोदकाम करून माती काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या नदीच्या काठावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या वीटभट्टी मालकांनी मातीचे उत्खनन करण्यासाठी या परिसरात असलेले सीताफळाचं वनही तोडले आहे. शिवाय, नदीच्या काठावर असलेले मोठमोठे वृक्ष तोडण्यात आल्याने नदीचा काठ कमकुवत होत चालला आहे. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी उपसरपंच राजेश गोमकर यांच्या नेतृत्वात या संदर्भात पारशिवनीचे तहसीलदार बाळासाहेब टेळे यांच्याकडे लेखी तक्रार केली. महसूल विभागाने या तक्रारीवर काहीही कार्यवाही न केल्याने पुढे ग्रामस्थांनी रामटेकचे उपविभागीय अधिकारी (महसूल) शेखर सिंह यांनाही निवेदन दिले. मात्र, कुणीही या गंभीर प्रकाराकडे लक्ष दिले नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. या वीटभट्ट्यांवर विटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी माती डोरली शिवारातून मोठ्या प्रमाणात आणली जाते. त्यामुळे तामसवाडी - डोरली या मार्गावर ओव्हरलोड वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान, एमएच-३१/सीक्यू-०७१८ क्रमांकाच्या भरधाव ट्रक दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीचा चुराडा झाला. काही दिवसांपूर्वी या मार्गावर एमएच-४०/वाय-१६१६ क्रमांकाचा ओव्हरलोड ट्रक पकडण्यात आला आणि जुजबी कारवाई करून तो सोडून देण्यात आला. अवैध खोदकामामुळे या परिसरात १५ ते २० फूट खोलीचे खड्डे तयार झाले आहे. पर्यवरणाचा ऱ्हास आणि पुराचा धोका विचारात घेता या प्रकराला आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ***