२३... पारशिवनी... कुत्रा

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:20+5:302015-01-23T23:06:20+5:30

पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला २५ जणांना चावा

23 ... parasitine ... dog | २३... पारशिवनी... कुत्रा

२३... पारशिवनी... कुत्रा

साळलेल्या कुत्र्यांनी घेतला २५ जणांना चावा
पारशिवनी येथील घटना : १६ जणांना मेयो रुग्णालयात हलविले
पारशिवनी : पिसाळलेल्या दोन कुत्र्यांनी पारशिवनी शहर व परिसरात हैदोस घातला आहे. या कुत्र्यांनी चार दिवसांत तब्बल २५ जणांना चावा घेत जखमी केले. यातील १६ जणांवर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या पिसाळलेल्या कुत्र्यांनी सोमवारपासून धुमाकूळ घालायला सुरुवात केली. शुक्रवारी दुपारी या दोन्ही कुत्र्यांनी शहरातील जुने बसस्थानक, पारशिवनी - सावनेर मार्गावरील चौक, बाजारचौक, पातीमाता देवस्थान परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला. दरम्यान, या कुत्र्यांनी स्थानिक व खरेदी करण्यासाठी पारशिवनी येथे आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना चावा घेत जखमी केले.
जखमींमध्ये राजेंद्र वांढरे रा. करंभाड, तुषार दूधकवडे, आचल शेंडे, सुशीला मस्के, उषा बावणे, जयश्री अडकिने, किसन रंगारी, सुखरेद येरखेडे, पार्वती साकोरे, सौरभ उरकुडे, राम बांगडकर सर्व रा. पारशिवनी, वसंता शास्त्री रा. पारसोडी, लव डहाके रा. पारशिवनी, चित्रा भगत रा. करंभाड, भीम हजारे रा. पारशिवनी, श्रीराम फुलबांधे रा. पारशिवनी आदींचा समावेश असून, या सर्वांना पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. उर्वरित जखमी नागरिक खासगी रुग्णालात उपचार घेत आहेत.
या कुत्र्यांनी सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांना चावा घेतल्याचे काहींनी सांगितले. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)
***

Web Title: 23 ... parasitine ... dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.