२३... मनसर... वेतन
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:24+5:302015-01-23T23:06:24+5:30
अंगणवाडी सेविकांचे चार महिन्यांचे मानधन रखडले

२३... मनसर... वेतन
अ गणवाडी सेविकांचे चार महिन्यांचे मानधन रखडलेमनसर : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन आधीच कमी आहे. त्यात रामटेक तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना मागील चार महिन्यांपासून मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. रामटेक तालुक्यातील अंगणवाडीमध्ये २०० अंगणवाडी सेविका आणि २०० मदतनीस कार्यरत आहेत. त्यांना मुलांना शालेय पोषण आहार वाटप करण्यापासून तर, मुलांना शिकविणे, लसीकरण यासह अन्य कामे पार पाडावी लागतात. याशिवाय, सदर कामाचा अहवालही तयार करावा लागतो. मनसर परिसरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची बैठक मनसर येथील अंगणवाडीमध्ये शुक्रवारी दुपारी पार पडली. त्यात चार महिन्यांचे मानधन मिळाले नाही, काही अधिकारी अपमानास्पद वागणूक देतात, आजारी पडल्यावरही रजा मंजूर केली जात नाही, प्रसंगी कामावरून कमी करण्याची तसेच मानधन कमी करण्याची धमकी दिली जाते, यासह अन्य महत्त्वाच्या बाबींची विस्तृत चर्चा करण्यात आली. प्रशासनाने सदर समस्यांची दखल न घेतल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा आणि प्रसंगी आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या प्रकरणी प्रशासनाने योग्य कार्यवाही करून आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे. (वार्ताहर)***