२३... कोराडी
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:24+5:302015-01-23T23:06:24+5:30
(फोटो)

२३... कोराडी
(फ ोटो)महामार्गालगतची ११ दुकाने जमीनदोस्त सिंचन विभागाची कारवाई : कोराडी मंदिर मार्गावरील अतिक्रमण हटविलेकोराडी : कोराडी टी पॉईंट ते मॉ जगदंबा महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या पुच्छ कालव्यालगत असलेल्या रिकाम्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण सिंचन विभागाने हटविले. यात ११ दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सुरू करण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोराडी टी पॉईंट ते मंदिराकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेली जागा ही सिंचन विभागाच्या अखत्यारित आहे. अनेक वर्षांपासून ही जागा रिकामी असल्याने त्यावर काही नागरिकांनी अतिक्रमण करून आपापले व्यवसाय सुरू केले होते. या जागेवर सध्या सलून, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, पानटपरी, हॉटेल्स यासह अन्य छोटीमोठी दुकाने थाटण्यात आली होती. मंदिराकडे जाणारा हा मार्ग आधीच अरुंद आहे. त्यात या मार्गालगत करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे रहदारीस मोठा अडसर निर्माण व्हायचा. येथून काही अंतरावर ऑटो स्टॅण्ड असल्यामुळे मंदिराकडून टी पॉईंटकडे येणाऱ्या वाहनचालकांना रस्ता दिसत नव्हता. त्यामुळे तिथे अपघातांचे प्रमाणही वाढले होतेे. सदर प्रकार नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. दरम्यान, पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही नोंदविली होती. या तक्रारीची दखल घेत महसूल विभागाने संबंधित अतिक्रमणधारकांना ती जागा खाली करून देण्यासंदर्भात पत्राद्वारे सूचनाही दिली होती. अतिक्रमणधारकांनी या पत्रातील सूचना गांभीर्याने घेतल्या नाही. परिणामी, अतिक्रमणधारक सदर जागा सोडत नसल्याचे लक्षात येताच सिंचन विभागातील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास या परिसरातील अतिक्रमण जेसीबीच्या मदतीने हटवायला सुरुवात केली. यावेळी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अतिक्रमणस्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. शिवाय, माहिती मिळताच नाना कंभाले व नगरसेवक रत्नदीप रंगारी सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सदर कारवाईला विरोध दर्शविला. एकाच बाजूचे अतिक्रमण तोडू नये, अशी मागणीही त्यांनी यावेळी रेटून धरली. त्यामुळे घटनास्थळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या कारवाईमुळे अनेक तरुण बेरोजगार होणार असल्याचा युक्तिवाद रत्नदीप रंगारी यांनी केला.