हिमाचलमध्ये बस दरीत कोसळून 23 ठार
By Admin | Updated: August 22, 2014 01:57 IST2014-08-22T01:57:10+5:302014-08-22T01:57:10+5:30
हिमाचल प्रदेशच्या किनौर जिल्ह्यातील रोहतरंग गावात एक खाजगी बस 400 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 23 ठार तर 20 जण जखमी झाले आहेत.

हिमाचलमध्ये बस दरीत कोसळून 23 ठार
शिमला : हिमाचल प्रदेशच्या किनौर जिल्ह्यातील रोहतरंग गावात एक खाजगी बस 400 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 23 ठार तर 20 जण जखमी झाले आहेत. ही बस 35 प्रवाशांना घेऊन सांगला घाटीकडून कालपाकडे जात होती. मृतांमध्ये बसच्या वाहक व चालकाचाही समावेश आहे.