२३... कन्हान... निवडणूक
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:14+5:302015-01-23T23:06:14+5:30
(फोटो)

२३... कन्हान... निवडणूक
(फ ोटो)निवडणूक प्रक्रियेचा निषेधकन्हान नगर परिषद निवडणूक : ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचणी निर्माण केल्याचा आरोपकन्हान : स्थानिक नगर परिषदेची पहिली निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचणी निर्माण करण्यात आल्याचा आरोप करीत शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी आणि अपक्ष उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेचा निषेध नोंदविला. यावेळी कार्यकर्त्यांनी नगर परिषद कार्यालयाच्या गेटसमोर निदर्शने करीत ईव्हीएमची प्रतिकात्मक होळी केली. काही मतदारांच्या नावावर बोगस मतदान करण्यात आले. विजयाच्या जवळ असलेले उमेदवार या तांत्रिक बाबींमुळे पराभूत झाले, असा आरोप माजी खा. प्रकाश जाधव यांनी केला. ही निवडणूक प्रभाग ऐवजी वॉर्ड पद्धतीने घ्यायला हवी होती. निवडणूक कार्यक्रम घाईघाईने जाहीर करण्यात आला, असा आरोप शिवसनेने शरद डोणेकर यांनी केला. यावेळी प्रकाश जाधव, शरद डोणेकर, वर्धराज पिल्ले, मनसेच्या मोना धुमाळ, बसपाच्या अनिता पानतावणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)***