२३... खापा... रेती
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:15+5:302015-01-23T23:06:15+5:30
(फोटो)

२३... खापा... रेती
(फ ोटो)रेतीची अवैध वाहतूकचार ट्रॅक्टर पकडले : १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्तखापा : उपविभागीय पोलीस अधिकारी (परिविक्षाधीन) मंगेश चव्हाण यांच्या पथकाने गस्तीदरम्यान केलेल्या कारवाईमध्ये अवैध रेतीवाहतुकीचे चार ट्रॅक्टर पकडले. यात तीन ब्रास रेतीसह एकूण १२ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री सावनेर तालुक्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोसेवाडी शिवारात करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी (परिविक्षाधीन) चव्हाण हे त्यांच्या सहकाऱ्यांसह गुरुवारी रात्री खापा परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, कन्हान नदीच्या गोसेवाडी रेतीघाटातून रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती चव्हाण यांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे या पथकाने गोसेवाडी परिसराची पाहणी केली. दरम्यान, एमएच-४०/ए-३९३, एमएच-४०/एल-५९७९, एमएच-४०-एल-४२६९ व विना क्रमांकाचा एक असे चार ट्रॅक्टर रेतीघाटातून बाहेर येत असताना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी चारही ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता, त्यांच्या ट्रॉलीमध्ये रेती असल्याचे निदर्शनास आले. कागदपत्रांच्या तपासणीदरम्यान सदर रेती विना रॉयल्टी असल्याचे स्पष्ट होताच चारही ट्रॅक्टर व त्यातील रेती जप्त करण्यात आली. या कारवाईमध्ये सहा हजार रुपये किमतीच्या तीन ब्रास रेतीसह एकूण १२ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी खापा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात खाप्याचे प्रभारी ठाणेदार विजयकुमार तिवारी, रामेश्वर कटरे, गजानन उकेबोंदरे, रवींद्र डोरले, गुड्डू निखारे, मधुकर खंडारे आदींनी केली. (प्रतिनिधी)***