२३... गुन्हे... जोड

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:27+5:302015-01-23T23:06:27+5:30

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

23 ... crime ... attachment | २३... गुन्हे... जोड

२३... गुन्हे... जोड

धाव ट्रकची दुचाकीला धडक
तरुणाचा मृत्यू : महालगाव शिवारातील अपघात
नागपूर : भरधाव ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्याची आई गंभीर जखमी झाली. ही घटना मौदा पेालीस ठाण्याच्या हद्दीतील महालगाव शिवारात गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
निखील नवनाथ चरडे (२२, रा. सेलू) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या जखमी आईचे नाव कळू शकले नाही. निखील हा त्याच्या आईला सोबत घेऊन एमएच-४०/जी-३२३९ क्रमांकाच्या मोटरसायकलने जात होता. दरम्यान, नागपूर - भंडारा महामार्गावरील महालगाव शिवारात एमएच-३१/सीआय-५५५६ क्रमांकाच्या ट्रकचालकाने इंडिकेटर न देता ट्रक वेगात उजवीकडे वळविला. त्यामुळे सदर ट्रकने निखीलच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात निखील व त्याची आई खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले. दोघांनाही लगेच नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान निखीलचा मृत्यू झाला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी ट्रकचालक गेंदलाल अंताराम पराते (४५, रा. नागपूर) याच्याविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून त्यास अटक केली. सदर घटनेचा तपास मौदा पोलीस करीत आहे.
***

Web Title: 23 ... crime ... attachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.