२३... गुन्हे

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:28+5:302015-01-23T23:06:28+5:30

निंबा येथे रेड्याची चोरी

23 ... crime | २३... गुन्हे

२३... गुन्हे

ंबा येथे रेड्याची चोरी
मनसर : गोठ्यात बांधलेला रेडा चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंबा येथे नुकतीच घडली.
फिर्यादी जितू ठाकूर यांच्या मालकीचा रेडा असून, त्याला गोठ्यात बांधून ठेवले होते. दरम्यान, मध्यरात्री चोरट्यांनी तो चोरून नेला. त्याचा परिसरात शोध घेतला असता, तो कुठेही गवसला नाही. त्याची किंमत अंदाजे ५० हजार रुपये असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. या प्रकरणी पारशिवनी पोलिसंनी गुन्हा नोंदूवन तपास सुरू केला आहे.
***
ढवळापूर शिवारात चोरी
नागपूर : काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढवळापूर व सावळी (खु.) शिवारातील मोबाईल टॉवरची बॅटरीकेबल व इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
काटोल तालुक्यातील ढवळापूर व सावळी (खु.) शिवारात रिलायन्स मोबाईल कंपनीचे टॉवर आहे. या टॉवरवरील बॅटरीकेबल, अर्थिंग व पॉवरकेबल चोरट्यांनी लंपास केले. या साहित्याची किंमत १० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी काटोल पोलिसांनी फिर्यादी निकेश कांबळी, रा. वाडी, नागपूर यांच्या तक्रारीवरून भादंवि ३३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***
अज्ञात वाहनाने पादचाऱ्यास उडविले
नागपूर : भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगेश्वर शिवारात मंगळवारी मध्यरात्री घडली.
जगदीश सुखदेव पांडे (४५, रा. बुटीबोरी) असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे. जगदीश पांडे हे कामावरून घरी पायी परत येत होते. दरम्यान, अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना उडविले. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बुटीबोरी पेालिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***

Web Title: 23 ... crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.