शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बांग्लादेशात 2200 अन् पाकिस्तानात 112 प्रकरणे...शेजारील देशांमध्ये हिंदूंवर हल्ले वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 19:50 IST

परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसभेत आकडेवारी सादर केली.

बांग्लादेशातील शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग पक्षाचे सरकार पडल्यानंतर बांग्लादेशात राहणाऱ्या हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत. इस्लामी/कट्टरपंथी मानसिकतेच्या मोहम्मद युनूस यांचे सरकार आल्यापासून तेथील हिंदूंच्या विरोधात आतापर्यंत 2200 हिंसाचाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याशिवाय, पाकिस्तानमध्येही हिंदूंविरुद्ध हिंसाचाराची 112 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी ही माहिती दिली.

राज्यसभेत आकडेवारी सादर करताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आम्ही बांग्लादेश आणि पाकिस्तान, या दोन्ही देशांना पत्रे लिहून हिंदूंची सुरक्षा, कल्याण सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, केंद्र सरकारने या घटना गांभीर्याने घेतल्या असून, बांग्लादेश सरकारकडे आपली चिंता व्यक्त केली आहे. भारताला आशा आहे की, बांगलादेश सरकार हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल.

पाकिस्तानबद्दल काय सांगितले

MEA च्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने पाकिस्तान सरकारलाही धार्मिक असहिष्णुता, जातीय हिंसाचार, छळ आणि अल्पसंख्याक समुदायांवर हल्ले थांबवण्याचे आवाहन केले आहे. शिवाय, त्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले आहे. भारत आंतरराष्ट्रीय मंचांवर पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांची परिस्थिती प्रभावीपणे मांडत राहील.

गेल्या तीन वर्षांची आकडेवारीMEA च्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये बांग्लादेशात हिंदूंच्या विरोधात 47 हिंसाचाराच्या घटना घडल्या, तर 2023 मध्ये 302 आणि 2024 मध्ये (8 डिसेंबर 2024 पर्यंत) ही संख्या 2200 पर्यंत वाढली  आहे. तसेच, 2022 मध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचाराचे 241 गुन्हे दाखल झाले होते, तर 2023 मध्ये 103 आणि 2024 मध्ये (ऑक्टोबरपर्यंत) 112 गुन्हे दाखल झाले आहेत. बांग्लादेश आणि पाकिस्तान व्यतिरिक्त इतर शेजारील देशात हिंदूंविरुद्ध हिंसाचाराचा गुन्हा दाखल झालेला नाही, असेही सरकारने म्हटले आहे. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तानIndiaभारतHinduहिंदू