२२... वाडी...संमेलन

By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:52+5:302015-01-23T01:05:52+5:30

(फोटो)

22 ... wadi ... meeting | २२... वाडी...संमेलन

२२... वाडी...संमेलन

(फ
ोटो)
गरज भासल्यास आंदोलन करू
एम. पी. सिंह : भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे संमेलन
वाडी : भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ हा देशातील मोठी संघटना आहे. सध्याचे केंद्र सरकारचे धोरण मजदूर संघाच्या विचारसरणीला अनुसरून आहे. मात्र, सरकारने या धोरणात बदल करून कामगारांच्या हितावर गंडांतर आणण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन उभारले जाईल, असा इशारा भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य एम. पी सिंह यांनी दिला.
आयुध निर्माणी, अंबाझरी स्थित समाज सदन हॉलमध्ये भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संमेलनाला सुरुवात करण्यात आली. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे महामंत्री विरजेश उपाध्याय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष कैलासनाथ शर्मा, रमेश पाटील, अशोक भुतडा, आयुध निर्माणीचे महाप्रबंधक सौरभ कुमार, संरक्षक श्रीराम वाटवे, स्वागताध्यक्ष आ. समीर मेघे आदी मान्यवर उपस्थित होते.
एम. रगदळे व ब्रिजेश सिंह यांनी संमेलनाच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. केंद्र सरकारने रक्षा उत्पादन क्षेत्राकडे आजवर दुर्लक्ष केल्याचा आरोप गोविंंदराव आठवले यांनी केला. संघटनेच्या संख्यात्मक वाढीसोबतच गुणात्मक विकास करणे गरजेचे आहे. यात भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ आघाडीवर आहे, असे प्रतिपादन सौरभ कुमार यांनी केले.
या संमेलनात शासनाच्या धोरणांसोबतच कामगारांच्या विविध समस्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. संचालन हर्षल ठोंबरे यांनी केले. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून ठराव पारित करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या प्रसंगी नरेंद्र तिवारी, दिनकर जोशी, व्ही. नावडे, ओ. पी. उपाध्याय, विनय इंगळे, महेश चरडे, सचिन धोटाने, डी. एस. राजूरकर यांच्यासह देशभरातील एक हजारपेक्षा अधिक सदस्य सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)
***

Web Title: 22 ... wadi ... meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.