२२... उमरेड... थकबाकी
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:54+5:302015-01-23T01:05:54+5:30
सहायक शिक्षकांना मिळणार थकबाकी

२२... उमरेड... थकबाकी
स ायक शिक्षकांना मिळणार थकबाकी उमरेड : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ११३ शिक्षकांना सुधारीत वेतनश्रेणीनुसार थकबाकी देण्याचा निर्णय घेतला असून, तसे आदेश निर्गमित केले आहे. संबधित पंचायत समितीला या शिक्षकांचा प्रस्ताव तपासून शासन निर्णयानुसार वेतन निश्चिती व थकबाकीची देयके त्वरित तयार करण्याचे आदेश दिल्यामुळे ११३ शिक्षकांना अखेर न्याय मिळाला आहे. अनुशेष भरती अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत २००३ ते २००४ मध्ये अप्रशिक्षित शिक्षणसेवकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या शिक्षणसेवकांचा तीन वर्षाचा सेवाकाळ पूर्ण झालेल्या तारखेपासून प्रशिक्षित झाल्यानंतर नियमित शिक्षक म्हणून कायमस्वरूपी केल्याच्या तारखेपर्यंत थकबाकी २४ एप्रिल २००७ च्या शासन निर्णयाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणीनुसार देण्यात यावे, या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या संदर्भात १८ जून २०१४ रोजी उच्च न्यायालयाने नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या संबधित ११३ शिक्षकांना सुधारीत वेतन श्रेणीनुसार थकीत वेतन तीन महिन्यांच्या आत देण्यात यावे, असे निर्देश दिले होते. या आदेशाला चार महिने उलटून गेल्यानंतरही प्रशासन कारवाई करीत नसल्याने वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना तसेच अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने आंदोलन केले होते. या आंदोेलनाची फलश्रुती म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या ११३ शिक्षकांना थकबाकी देण्याचा आदेश जारी केला असल्याची माहिती एकनाथ पवार, राजू चव्हाण, अशोक पवार, सुजित चव्हाण, पंजाब राठोड, नरेंद्र महात्मे आदींनी संयुक्तरीत्या दिली. (तालुका प्रतिनिधी)***