शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य आपत्ती निवारणासाठी केंद्राकडून २२ राज्यांना निधी, महाराष्ट्राला सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 16:52 IST

केंद्र सरकारने आपत्ती निवारणासाठी २२ राज्यांना आज निधी वाटप केला असून महाराष्ट्राला सर्वाधिक

नवी दिल्ली - राज्यातील ओला दुष्काळ, पूरग्रस्तांना किंवा पावसाळ्यातील हानी भरुन काढण्यासाठी राज्य सरकारकडून फारशी मदत होत नाही. कारण केंद्र सरकार निधी देत नाही अशी ओरड महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करत होते. मात्र, आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर केंद्र सरकारने आपला हात ढीला केला आहे. केंद्र सरकारकडून आज देशातील २२ राज्यांना आपत्ती निवारणासाठी ७५३२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. त्यामध्ये, सर्वाधिक निधी महाराष्ट्र सरकारला देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून हा निधी आजच वितरीत करण्यात आला आहे. 

केंद्र सरकारने आपत्ती निवारणासाठी २२ राज्यांना आज निधी वाटप केला असून महाराष्ट्राला सर्वाधिक १४२०.८० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या यादीत उत्तर प्रदेश राज्य दुसऱ्या क्रमांकावर असून ओडिशाचा तिसरा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशला ८१२ कोटी रुपयांना निधी वितरीत करण्यात आला असून ओडिशाला ७०७.६० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होम स्टेट असलेल्या गुजरातला राज्य आपत्ती निवारणासाठी ५८४ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. 

सध्या मोठ्या प्रमाणात पावसाने हाहाकार माजलेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांना केंद्र सरकारने निधी देऊ केला आहे. त्यामध्ये, हिमाचल प्रदेशसाठी १८०.४० कोटी तर उत्तराखंडसाठी ४१३.२० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. या यादीत सर्वात कमी निधी गोवा सरकारला देण्यात आला असून केवळ ४.८० कोटी रुपये गोवा राज्यातील आपत्ती निवारणासाठी देण्यात आले आहे. मात्र, केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक निधी देऊ केला आहे. त्यामुळे, अनेकांच्या भुवयाउंचावल्या आहेत.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रfloodपूरdroughtदुष्काळCentral Governmentकेंद्र सरकार